Gavaskar On Jasprit Bumrah pudhari
स्पोर्ट्स

Gavaskar On Jasprit Bumrah: तू एक व्यावसायिक क्रिकेटपटू आहेस तरी... गावसकर बुमराहवर जाम भडकले, नेमकं काय झालं?

Anirudha Sankpal

Gavaskar On Jasprit Bumrah: मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी यंदाचा आयपीएल हंगाम हा एका वाईट स्वप्नासारखा ठरत आहे. तो वाईट गोलंदाजी करत नसतानाही त्याच्या विकेट्सची पाटी मात्र कोरीच रहू लागली आहे. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी जसप्रीत बुमराह प्रत्येक सामन्यात जोर लावून गोलंदाजी करतोय. मात्र त्याला त्याच्या लौकीकास साजेसा खेळ करता येत नाहीये. एवढंच काय तर आता जसप्रीत बुमराहचं सामन्यात नो बॉल टाकण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. त्यावरून गावसकर यांनी त्याचे चांगलेच कान उपटले.

विकेट नाही ते नाही आता...

३२ वर्षाच्या जसप्रीत बुमराहने आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत आठ नो बॉल टाकले आहेत. विशेष म्हणजे सोमवारी रात्री लखनौ सुपरजायंट्सविरूद्धच्या सामन्यात तर त्याने ३ नो बॉल टाकले. यावरूनच भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर जसप्रीत बुमराहवर जाम भडकले. बुमराहने १४ व्या षटकात दोन नो बॉल टाकल्यानंतर गावसकर यांनी बुमराहला चांगलेच फैलावर घेतलं.

सुनिल गावसकर यांनी टी २० क्रिकेटमध्ये नो बॉल टाकणे कदापी समर्थनीय नाही. तुम्हाला अजून व्यावसायिकपणा दाखवता आला पाहिजे. बुमराहने हिम्मत सिंहला बाद केलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. पंचांनी तो नो बॉल असल्याचा इशारा केला. याच हिम्मत सिंहने लखनौसाठी ४० धावा केल्या अन् संघाला २२० धावांचा टप्पा पार करून दिली.

हे कदापी स्विकारार्ह्य नाही

याबाबत बोलताना गावसकर म्हणाले, 'जसप्रीत बुमराहने नो बॉ टाकला हे मला सांगू नका. ते कदापी मान्य नाही. कधीच मान्य होणा रनाही. तू एक व्यावसायिक क्रिकेटपटू आहेस. त्यामुळं हे स्वाकारार्ह्य नाहीच. वाईड बॉल... मी समजू शकतो. मात्र नो बॉल अजिबात नाही.' गावसकरांनी समालोचन करत असताना दिग्गज बुमराहचे असे कान टोचले.

जसप्रीत बुमराहने १४ व्या षटकात सलग दोन नो बॉल टाकले. त्यानंतर कॅमेरा मुंबईचे प्रमुख प्रशिक्षक महेला जयवर्धनेवर पॅन झाला. तिथं लसित मलिंगा देखील होता. ते बुमराहच्या नो बॉलनंतर नि:शब्द होते.

वाईट आयपीएल हंगाम

ज्यावेळी कॅमेरा मलिंगावर पॅन झाला त्यावेळी गावसकर म्हणाले, होय बॉलिंग कोच हा खूप मोठा नो बॉल आहे. बुमराहला कोणतीही विकेट घेता आलेली नाही. लखनौ सुपर जायंट्सविरूद्धच्या सामन्यात बुमराहला विकेट घेता आलेली नाही. त्याने चार षटकात ४५ धावा दिल्या. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची त्याची कामगिरी पाहिली तर त्याने १० सामन्यात फक्त ३ विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहसाठी हा आयपीएल हंगाम अत्यंत वाईट गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT