Smriti Mandhana Wedding Row First Post: भारताची स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाचे पलाश मुच्छल सोबत ठरलेलं लग्न पुढे ढकलावं लागलं. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळं ऐत्यावेळी लग्न रद्द करण्यात आलं. मात्र यानंतर सोशल मीडियावर याबाबत अनेक थेअरीज फ्लोट होत होत्या.
या घटनेनंतर स्मृती मानधनानं कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. ती wpl च्या लिलावात देखील सहभागी झाली नव्हती. अखेर आज (दि. ५ डिसेंबर) तिने सोशल मीडियावर पोस्ट केली. ही लग्न पुढे ढकलल्यानंतरची तिची पहिलीच सोशल मीडिया पोस्ट आहे.
स्मृतीची ही पोस्ट तिच्या लग्नाबाबत किंवा पलाश मुच्छल किंवा क्रिकेटबाबत नाहीये तर ही पोस्ट एका जाहिरातीचा भाग आहे. एका टूथपेस्टच्या जाहिरातीसाठी स्मृतीने ही मुलाखत दिली आहे. या व्हिडिओत ती वर्ल्डकप फायनलच्या रोमहर्षक क्षणांबद्दल बोलताना दिसत आहे.
तर याच व्हिडिओत स्मृती मानधना राहुल द्रविडचा देखील उल्लेख करते. ही जाहिरात ओरल हेल्थ बाबत आहे. शेवटी स्मृती दात घासताना देखील दिसते.
स्मृती मानधना अन् पलाश मुच्छलच्या पुढे ढकलण्यात आलेल्या लग्नाबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडियावर अनेक चॅट्स अन् अनेक थेअरी व्हायरल झाल्यानंतर अखेर पलाश मुच्छल हा विमानतळावर स्पॉट झाला होता. त्यानंतर पलाश हा वृंदावन इथं प्रेमानंद महाराज यांच्या चरणी देखील लीन झाल्याचं दिसलं होतं.
मध्यंतरी स्मृती आणि पलाशचं हे पुढे ढकलण्यात आलेलं लग्न ७ डिसेंबर रोजी होणार अशी सोशल मीडिायवर पोस्ट व्हायरल झाली. मात्र स्मृतीच्या भावाने याबाबत कोणतीही कल्पना नाही. हे लग्न सध्या तरी पुढे ढकलण्यात आलं आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.
दुसरीकडं पलाशच्या आईनं सगळं लवकरच ठीक होईल अन् पलाश स्मृतीचं लग्न लवकरच होईल असा आशावाद देखील बोलून दाखवला होता.