स्पोर्ट्स

SIR ALEX : सर अॅलेक्स फर्ग्युसन वाढदिवस विशेष

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन :  सर अॅलेक्स (SIR ALEX)  फर्ग्युसन हे मँचेस्टर युनायटेडचे मॅनेजर असताना ३० हून अधिक चषक जिंकले आहेत. सर अलेक्झांडर चॅपमन फर्ग्युसन, यांना आपण सर अॅलेक्स किंवा अॅलेक्स फर्ग्युसन म्हणून ओळखतो.

ते ब्रिटिश फुटबॉल इतिहासातील सर्वात यशस्वी व्यवस्थापकांपैकी एक आहेत. फर्ग्युसन यांनी स्कॉटलंडमध्ये एक खेळाडू आणि नंतर मॅनेजर म्हणून यश संपादन केले. परंतु, त्यांचा सर्वात लोकप्रिय कार्यकाळ अर्थातच १९८६ ते २०१३ मँचेस्टर युनायटेड या फुटबॉल संघासोबत आहे. या क्लबला मार्गदर्शन करण्याच्या त्यांच्या अविश्वसनीय कार्यकाळात पहिल्या वर्षांपासून ते निवृत्त होण्यापर्यंत फर्ग्युसन यांनी मँचेस्टर युनायटेडला युरोपमधील महत्वपूर्ण असणारी प्रीमियर लीगचे विजेतेपद तब्बल १३ वेळा मिळवून दिले आहे.

आतापर्यंतच्या काळातील सर्वोत्कृष्ट मॅनेजरांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या सर अॅलेक्सनी खेळाच्या इतिहासात इतर कोणत्याही मॅनेजरपेक्षा जास्त ट्रॉफी जिंकल्या आहेत. ओल्ड ट्रॅफर्ड येथे असताना, सर अॅलेक्सनी पाच वेळा एफए कप आणि चार वेळा लीग कप जिंकला. त्यांनी युनायटेडला दोन UEFA चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.

एकंदरीत, फर्ग्युसन यांनी ओल्ड ट्रॅफर्ड येथे मॅनेजर असताना ३० हून अधिक ट्रॉफी जिंकल्या. मॅनचेस्टरच्या फुटबॉल मैदानावर म्हणजेच ओल्ड ट्रॅफर्ड येथे त्यांच्या पाच महान कामगिरी आहेत.

पहिला प्रीमियर लीग विजय १९९३

रेड डेव्हिल्सच्या प्रतिष्ठा विजयाने इंग्लिश फुटबॉलला असणारी प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी सर अॅलेक्स फर्ग्युसनी त्याकाळी फार कष्ट घेतले. सर अॅलेक्स यांनी त्यांच्या २६ वर्षांच्या काळात मँचेस्टर युनायटेडची प्रतिष्ठा कायम राखण्याचा प्रयत्न केला.

२६ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा

१९९३ या वर्षात युनायटेडला पहिल्या प्रीमियर लीगमध्ये नेल्यानंतर, फर्ग्युसन यांनी १९९५-९६ हंगामात या पराक्रमाची पुनरावृत्ती केली. त्यांनी ही कामगिरी त्याकाळी नवोदीत असणारे खेळाडू डेव्हिड बेकहॅम, पॉल स्कोलेस, गॅरी नेव्हिल आणि रायन गिग्स यांच्यासोबत केली.

चॅम्पियन्स लीग फायनल – १९९९

चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये मँचेस्टर युनायटेडने बायर्न म्युनिकचा २-१ असा पराभव केला. फर्ग्युसनच्या खेळाडूंनी जोरदार खेळ करत विजय नोंदवण्यासाठी दुखापतीच्या वेळेत दोन जलद गोल केले, या विजयाने मॅनचेस्टर युनायटेडने तिहेरी ट्रॉफी जिंकली. या विजयाने त्यांच्या खात्यात प्रीमियर लीग आणि FA कपसह चॅम्पियन्स लीगच्या विजेतेपदाची भर पडली.

चॅम्पियन्स लीग फायनल – २००७-०८ (पेनल्टीवर विजय )

चॅम्पियन्स लीगच्या ऑल इंग्लिश फायनलमध्ये मँचेस्टर युनायटेडने चेल्सीचा पेनल्टीवर पराभव केला. अतिरिक्त वेळेत 1-1 अशा बरोबरीनंतर, मँचेस्टरचा गोलकीपर एडविन व्हॅन डेर सारने केलेल्या महत्वाच्या सेव्हनी मँचेस्टर युनायटेडला तिसरे युरोपियन चॅम्पियनशिप मिळवून दिले.

प्रीमियर लीग – २०१२-१३

मुख्य मॅनेजर म्हणून सर अॅलेक्स यांच्या शेवटच्या सीझनमध्ये त्यांनी केवळ त्यांच्या १००० व्या खेळचे प्रशिक्षणे केले नाही तर, त्यानी त्यांचे १३वे प्रीमियर लीग विजेतेपदही जिंकले, कारण त्याच्या संघाने मँचेस्टर सिटीचा ११ गुणांच्या फरकाने पराभव केला..

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT