Shubman Gill Shubman Gill twitter
स्पोर्ट्स

Shubman Gill: शुभमन गिलने मुंबईत खरेदी केलं करोडोंचं आलिशान घर, किंमत ऐकून थक्क व्हाल!

Shubman Gill Mumbai house:मैदानात उतरण्यापूर्वीच गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल एका मोठ्या व्यवहारामुळे चर्चेत आला आहे. शुभमनने मुंबईतील अतिशय उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसरात एक आलिशान घर खरेदी केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Shubman Gill Mumbai house

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या हंगामाचा थरार आजपासून (२८ मार्च) सुरू होत आहे. मात्र, मैदानात उतरण्यापूर्वीच गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल एका मोठ्या व्यवहारामुळे चर्चेत आला आहे. शुभमनने मुंबईतील अतिशय उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या जुहू परिसरात एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले असून, त्याची किंमत २० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले आहे.

३,३०० स्क्वेअर फूटचे प्रशस्त घर

'झॅपकी' या रिअल इस्टेट डेटा अ‍ॅनालिटिक्स प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, शुभमन गिलने जुहू-तारा रोडवरील ‘पूजा लुमिनेयर’ या निर्माणाधीन प्रकल्पात १२ व्या मजल्यावर हे घर घेतले आहे. ३,३६९ चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या फ्लॅटसाठी त्याने २०.७ कोटी रुपये मोजले आहेत. विशेष म्हणजे, या व्यवहारासाठी शुभमनने सुमारे १.२४ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरले आहे. या घराचा प्रति चौरस फूट दर सुमारे ६१,४४२ रुपये इतका आहे.

भगनानी कुटुंबाच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक

शुभमनने हे अपार्टमेंट ‘पूजा लेझर अँड लाइफस्टाइल’ या रिअल इस्टेट कंपनीकडून खरेदी केले आहे. ही कंपनी प्रसिद्ध चित्रपट निर्माते वाशू भगनानी, त्यांची पत्नी पूजा आणि अभिनेता जॅकी भगनानी यांच्या मालकीची आहे. १६ मजली 'लुमिनेयर' हा प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाद्वारे भगनानी कुटुंबाने मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये आपली पकड मजबूत केली आहे.

जुहू हा परिसर चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी आणि बड्या उद्योजकांसाठी ओळखला जातो. शुभमन गिलच्या आधी रोहित शर्मा, झहीर खान आणि सूर्यकुमार यादव यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनीही मुंबईतील प्रीमियम रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. आता शुभमनदेखील या 'एलिट' क्लबमध्ये सामील झाला आहे.

भारतीय संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार असलेल्या शुभमन गिलकडून यंदाच्या आयपीएल हंगामात गुजरात टायटन्सला मोठ्या अपेक्षा आहेत. मैदानाबाहेर घराची 'सेंचुरी' पूर्ण केल्यानंतर, आता मैदानावर तो कशी कामगिरी करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT