Shreyas Iyer Punishment PUDHARI
स्पोर्ट्स

Shreyas Iyer Punishment: अय्यर ठरला आयपीएलच्या हंगामातील नियमभंगाचा पहिला गुन्हेगार; सामना जिंकूनही खिसा झाला रिकामा

Anirudha Sankpal

Shreyas Iyer Punishment: पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर यंदाच्या आयपीएल हंगामातील नियम भंगांचा पहिला गुन्हेगार ठरला आहे. आयपीएलमध्ये संथ गतीनं षटके टाकण्याचा पहिला गुन्हा पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नावावर नोंदवला गेला आहे. गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरला संथ षटक गती राखल्याप्रकरणी आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या खिशातून तब्बल १२ लाख रूपये कापण्यात आले आहेत.

हंगामातील पहिला दंड

आयपीएलने प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात, 'पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरला सामना क्रमांक ४ मध्ये त्यांच्या संघाने संथ षटक गती राखल्याने दंड ठोठावण्यात आला आहे. हा सामना चंदीगडमधील न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झाला होता.

वक्तव्यात पुढे सांगण्यात आलं की, 'हा या संघाचा हंगामातील पहिलाच नियमभंग असल्याने आयपीएल कोड ऑफ कंडक्टच्या आर्टिकल २.२२ अंतर्गत अय्यरला १२ लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

अय्यरची पहिलीच वेळ नाही

श्रेयस अय्यरवर कमी षटक गती राखल्याबद्दल कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी देखील अय्यरला बीसीसीआयच्या शिक्षेचा सामना करावा लागला होता. एकदा नाही तर दोनदा हा सामना करावा लागला होता. त्याला पहिल्यावेळेस १२ लाखांचा तर दुसऱ्या वेळेच २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.

पंजाबला गुजरातचं कडवं आव्हान

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सविरूद्ध निसटता विजय मिळवला. गुजरातने १६२ धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात खेळताना पंजाब किंग्जने २ बाद ११० धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या विकेटसाठी प्रभसिमरन सिंग आणि कूपर कॉन्नॉली यांनी ७७ धावांची भागीदारी रचली होती.

मात्र यानंतर पंजाबचा डाव घसरला अन् त्यांची अवस्था ६ बाद ११८ धावा झाली. मात्र झेव्हियर बार्टलेटने डाव सावरत पंजाबला विजयाचं खातं उघडून दिलं. त्याने ४४ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. इंम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणाऱ्या गुजरातच्या प्रसिद्ध कृष्णाने १३ व्या षटकात गोलंदाजी करत मोठा धकमा केला. त्याने तीन धावात तीन विकेट्स घेतल्या. यासाठी त्याने फक्त १० चेंडूच टाकले. यामुळेच विजयीपथावर मार्गस्थ असलेल्या पंजाबला ८ धावात चार विकेट्स गमवाव्या लागल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT