Shahid Afridi India Vs Pakistan Pudhari photo
स्पोर्ट्स

India Vs Pakistan: २ षटकात ३१ धावा... जर मला निर्णय घ्यायचा असेल तर... पाकिस्तानच्या पराभवानंतर सासरा जावयावर चांगलाच भडकला

Anirudha Sankpal

India Vs Pakistan Shahid Afridi: टी २० वर्ल्डकप २०२६ मध्ये भारतानं पाकिस्तानचा सहज पराभव केला. या पराभवामुळं आता पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप आला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद अफ्रिदीनं पाकिस्तान संघातील वरिष्ठ खेळाडूंना चांगलेच धारेवर धरलं आहे. अफ्रिदीने आपला जावाई शाहीन शहा अफ्रिदीला देखील सोडलं नाही.

जर मला निर्णय घ्यायचा असेल तर...

शाहीद अफ्रिदीने स्पष्टपणे सांगितलं की आता सतत अपयशी ठरणाऱ्या वरिष्ठ खेळाडूंना आराम देऊन युवा खेळाडूंना संधी दिली पाहिजे. शाहीद अफ्रिदीने बाबर आझम, शाहीन अफ्रिदी आणि शादाब खान यांना बेंचवर बसवण्याचा सल्ला दिला आहे. शाहीदच्या मते या खेळाडूंना सतत संधी मिळाली आहे. मात्र हे मोठ्या सामन्यात सतत अपयशी ठरत आहेत.

समा टीव्हीशी बोलताना शाहीद म्हणाला, 'जर मला निर्णय घ्यायचा असेल तर मी शाहीन, बाबर आणि शादाब या दिघांना बेंचवर बसवेन. नवीन खेळाडूंना संधी देईन. त्यांच्यावर विश्वास दाखवेन. नामिबियाविरूद्धच्या सामन्यात तरूण खेळाडूंना खळवून त्यांना आत्मविश्वास देण्याची गरज आहे.'

तो पुढे म्हणाला, 'आपण या खेळाडूंना इतक्या वर्षांपासून संधी देतोय. ज्या संघाविरूद्ध हे कामगिरी करणार अशी आशा असते त्या सामन्यात हे वरिष्ठ खेळाडू जर कामगिरी करू शकले नाहीत. तर त्यांना बेंचवर बसवून ज्युनिअर खेळाडूंना संधी देऊन त्यांना आजमावून पाहण्यात काय हरकत आहे.'

जावयाची झाली खूप धुलाई

शाहीनने शाहीदच्या मुलीशी अंशाशी २०२३ मध्ये लग्न केलं आहे. शाहीद अफ्रिदीचा जावई शाहीन अफ्रिदीची भारताविरूद्धच्या सामन्यात चांगलीच धुलाई झाली. या सामन्यात पाकिस्तानचा तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्यानं २ षटकात तब्बल ३१ धावांची लयलूट केली. डावाच्या शेवटच्या षटकात शाहीनने १६ धावा केल्या.

यामुळं भारतीय संघ १७० धावांच्या पार गेला. शादाब खानसाठी देखील हा दिवस चांगला नव्हता. त्यानं १ षटकात १७ धावा दिल्या. तर फलंदाजीत देखील तो १४ धावा करून बाद झाला. बाबर आझम देखील फारसा प्रभाव टाकू शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT