पुढारी ऑलाईन डेस्क : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वीच, भारताने सलग १३ नाणेफेक गमावून एक नकोसा विक्रम रचला आहे. त्याच वेळी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलपासून सुरुवात करून सलग 13 व्या एकदिवसीय सामन्यात टॉस गमावला.
यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये, नेदरलँड्सने २०११ ते २०१३ दरम्यान सलग ११ नाणेफेक गमावली होती, परंतु आता भारत या बाबतीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. यावेळी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या संघामध्ये एक बदल करण्यात आलेला आहे त्यामध्ये डॅरेल मिचेल हा डेवॉन कॉनवेच्या बदल्यात खेळणार आहे. तर भारतीय संघाने हर्षित राणाच्या बदल्यात फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला खेळवले आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड संघ : विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (यष्टिरक्षक), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओ'रोर्क
भारत - १३, २ मार्च २०२५ (शेवटचा एकदिवसीय सामना)
नेदरलँड्स - ११, २७ ऑगस्ट २०१३ (शेवटचा एकदिवसीय सामना)
इंग्लंड - ९, २९ मे २०१७ (शेवटचा एकदिवसीय सामना)
इंग्लंड - ९, १३ सप्टेंबर २०२३ (शेवटचा एकदिवसीय सामना)
ऑस्ट्रेलिया - ९, २४ जानेवारी १९९९ (शेवटचा एकदिवसीय सामना)