Rohit Sharma Retirement pudhari
स्पोर्ट्स

Rohit Sharma Retirement: रोहित शर्माची निवृत्ती... गौतम गंभीरची उचलबांगडी... BCCI उपाध्यक्ष नेमकं काय म्हणतंय?

Anirudha Sankpal

Rohit Sharma Retirement: गेल्या काही दिवसांपासून भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा वनडेमधूनही निवृत्त होणार अशी चर्चा सुरू झाली होती. रोहितला निवृत्तीचा निर्णय घेण्यास भाग पाडलं जात आहे अशी देखील माहिती समोर आली होती. इंग्लंड दौऱ्यावर रोहित शर्मा शेवटच्या सामन्यानंतर निवृत्त होईल असं सांगितलं जात होतं. त्यामुळं सामन्यापूर्वी वातावरण फारच गरम झालं होतं.

तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने १३८ धावांची खेळी केली. त्यानंतर त्याने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युतर दिलं. त्याने आपल्या २०२७ च्या वनडे वर्ल्डकप खेळण्याबाबत देखील गोष्टी स्पष्ट केल्या.

दरम्यान, गौतम गंभीरची देखील नोकरी जाणार अशी चर्चा होती. त्याच्या ऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे संघाच्या मार्गदर्शकाची सूत्रे देण्यात येईल असे वृत्त होते. त्यावर देखील बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या सर्व मुद्द्यांवर बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आगरामधील युपी टी २० च्या चौथ्या हंगामाच्या मिनी ऑक्शनच्या उद्घाटनला शुक्ला आले होते. त्यावेळी त्यांनी गंभीर आणि रोहितबाबत वक्तव्य केलं.

राजीव शुक्ला पत्रकारांना म्हणाले, 'रोहित शर्मा आमच्या संघाचा भाग आहे आणि तो खेळत आहे. माध्यमे आणि सोशल मीडियावर ज्या गोष्टी सुरू आहेत त्याला काही अर्थ नाही. त्याच्या निवृत्तीचा प्रश्नच नाहीये.'

शुक्ला यांनी सध्याच्या नेतृत्वाला देखील पाठिंबा दिला. तसेच त्यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांची पाठराखण केली.

ते म्हणाले, 'प्रत्येकाला आपले मत ठेवण्याचा हक्का आहे. मात्र संघात कोण राहणार आणि कोण नाही याचा निर्णय निवडसमितीचा आहे. भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. प्रत्येक सामना जिंकत आहे. त्यामुळं आता कोणताही बदल गरजेचा नाही.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT