वॉर्नर झाला आता रोहित रडारवर... षटकार किंग संजू सुसाट file photo
स्पोर्ट्स

वॉर्नर झाला आता रोहित रडारवर... षटकार किंग संजू सुसाट

संजू सॅमसनचा जलवा! सर्वाधिक षटकारांच्या यादीत वॉर्नरला टाकले मागे

पुढारी वृत्तसेवा

rohit sharma number 2 sanju samson leave dadid warner behind most sixes in ipl top 7 batsman

पुढारी ऑनलाईन :

IPL 2026 मधील 48व्या सामन्यात दिल्लीविरुद्ध खेळताना 6 षटकार ठोकल्यानंतर संजू सॅमसनने आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे. या यादीत रोहित शर्मा अजूनही दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

IPL 2026 च्या 48व्या सामन्यात चेन्नईने दिल्लीचा पराभव केला. या सामन्यात चेन्नईचा सलामीवीर संजू सॅमसनने नाबाद 87 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या डावात 6 षटकार आणि 7 चौकार लगावले. या 6 षटकारांच्या जोरावर संजूने आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले.

संजूने वॉर्नरला मागे सोडले

संजू सॅमसन यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांत 402 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 21 षटकार आणि 42 चौकार निघाले आहेत. दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही त्याने उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला आणि ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावला.

या सामन्यातील 6 षटकारांसह संजूच्या आयपीएलमधील एकूण षटकारांची संख्या 240 वर पोहोचली आहे. तर डेव्हिड वॉर्नरच्या नावावर 236 षटकार आहेत. त्यामुळे संजू आता या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला असून वॉर्नर सातव्या स्थानावर घसरला आहे.

या यादीत पहिल्या क्रमांकावर ख्रिस गेल असून त्याच्या नावावर 357 षटकार आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा 317 षटकारांसह आहे, तर विराट कोहली 306 षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

IPL मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप-8 फलंदाज

357 षटकार – ख्रिस गेल

317 षटकार – रोहित शर्मा

306 षटकार – विराट कोहली

264 षटकार – एम.एस. धोनी

251 षटकार – एबी डिव्हिलियर्स

240 षटकार – संजू सॅमसन

236 षटकार – डेव्हिड वॉर्नर

232 षटकार – के.एल. राहुल

भारताच्या पर्यायी टी20 प्लेइंग-11 ची निवड

IPL 2026 दरम्यान सध्याच्या फॉर्मच्या आधारे वेस्ट इंडिजच्या माजी दिग्गज खेळाडूने भारताच्या पर्यायी टी20 प्लेइंग-11 ची निवड केली आहे. या संघात वैभव, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, नितीश, युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांसारख्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT