Rinku Singh Dropped pudhari
स्पोर्ट्स

Rinku Singh Dropped: फिनिशर रिंकू सिंहची आंतरराष्ट्रीय कारकीर्दच फिनीश..? निवडसमितीने एक चकार शब्दही काढला नाही

Anirudha Sankpal

Rinku Singh Dropped From Team India: अफगाणिस्तानविरूद्धच्या २ सामन्यांच्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा झाली. भारतीय संघाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर असून तिलक वर्माला उपकर्णधार करण्यात आलं आहे. या संघात मोठे बदल करण्यात आले असून संजू सॅमसनने संघात पुन्हा पुनरागमन केलं आहे. मात्र एक धक्कादायक निर्णय म्हणजे फिनिशर रिंकू सिंहला संघातील आपलं स्थान गमवावं लागलं आहे.

निवडसमितीकडून स्पष्टीकरण नाही

भारतीय संघातील चार खेळाडू, बुमराह, राणा, सुंदर आणि रेड्डी यांचा समावेश फिटनेस टेस्ट पास झाल्यावर होणार आहे. दुसरीकडं रिंकू सिंहला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. रिंकू झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघाचा भाग रोहात मात्र आता अचानक त्याला संघातून वगळ्यात आलं आहे. चाहते आता रिंकू सिंहचे टी २० करिअरच संपुष्टात आलं आहे का अशी चर्चा करत आहेत.

बीसीसीआय निवडसमितीने रिंकू सिंहला संघातून का काढून टाकण्यात आलं याचं स्पष्ट असं कोणतंही कारण दिलेलं नाही. रिंकू हा फिनिशर असून त्याने अनेक सामने भारताला चांगल्या पद्धतीनं फिनिश करून दिले होते.

इतर पर्यायांची चाचपणी

मात्र आता टी २० क्रिकेटमध्ये भारताकडे फलंदाजीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळं संघ व्यवस्थापन वेगवेगळे कॉम्बिनेशन तपासून पाहत आहे. रिंकूचे सध्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती. झिम्बाब्वे दौऱ्यावर त्याला चमक दाखवता आली नाही. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आलं आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यावर रिंकूला ३ सामन्यात एकूण ३७ धावा करता आल्या आहेत. रिंकू सिंह २०२६ मध्ये टी२० वर्ल्डकप जिंकून देण्याऱ्या संघात समाविष्ट होता. त्याने वर्ल्डकपमध्ये ५ सामन्यात फक्त २४ धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये देखील रिंकू अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्याने ११ डावात १४८.९८ च्या स्ट्राईक रेने फक्त २९५ धावा केल्या.

स्थानिक स्पर्धेतही निराशा

सध्याच्या घडीला रिंकू युपी टी २० लीगमध्ये मेरठ मावेरिक्सचे कर्णधारपद भूषवत आहे. मेरठकडून खेळताना रिंकूने ९ डावात १७८.८५ च्या स्ट्राईक रेटने ३७२ धावा केल्या आहेत. इथं देखील त्याला मोठी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळं भारतीय संघातून देखील रिंकूचा पत्ता कट झाला आहे.

कशी आहे रिंकूचे आंतरराष्ट्रीय कारकीर्द?

  • सामने - ४८

  • धावा - ७०२

  • स्ट्राईक रेट १५६.३५

  • सर्वोच्च धावसंख्या - नाबाद ६९

  • अर्धशतके - ३

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT