स्पोर्ट्स

Spanish Super Cup : बार्सिलोनाला हरवून रियाल माद्रिद चॅम्पियन

Arun Patil

रियाध (सौदी अरेबिया), वृत्तसंस्था : विनिसियस ज्युनिअरच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर रियाल माद्रिदने सौदी अरेबियात झालेल्या अंतिम सामन्यात आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी बार्सिलोना संघाला 4-1 असे हरवून स्पॅनिश सुपर कप (Spanish Super Cup) फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. रविवारी झालेल्या सामन्यात विनिसियसने पूर्वार्धातच हॅट्ट्रिक नोंदवून रियाल माद्रिदचा विजय निश्चित केला.

सुपर कपमध्ये रियाल माद्रिदचे हे 13 वे अजिंक्यपद आहे. बार्सिलोनाने 14 वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे. विनिसियसने पहिला गोल केल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोसारखा जल्लोष केला. रियालकडून चौथा गोल रॉड्रिगोने केला. बार्सिलोनाकडून एकमेव गोल लेवाँडोस्कीने पहिल्या हाफमध्ये केला. (Spanish Super Cup)

सध्याच्या घडीला लिओनल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी समजले जातात. विशेष म्हणजे, मेस्सी हा पूर्वी बार्सिलोनाकडून, तर रोनाल्डो रियाल माद्रिदकडून खेळत होते. त्यामुळे हे दोन संघ जेव्हा आमनेसामने येत त्यावेळी जगातील सर्वात हायव्होल्टेज सामना बनत असे. परंतु, आता दोन्ही खेळाडूंनी नवीन क्लब निवडल्यामुळे या सामन्यात तितकीशी ईर्ष्या जाणवली नाही.

हेही वाचा…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT