आदित्य बिर्ला समूहाने (ABG) 'रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू' (RCB) हा संघ विकत घेतला आहे. 
स्पोर्ट्स

RCB Mega Deal | १६,७०० कोटींच्या विक्री व्यवहारानंतर RCB चे नाव बदलणार? अनन्या बिर्लाने दिले उत्तर

RCB Mega Deal | 'आरसीबी' संघ विक्री व्‍यवहारात पुरुष आणि महिला दोन्ही संघांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

RCB Mega Deal

बंगळूरु : आदित्य बिर्ला समूहाने (ABG) 'रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू' (RCB) हा संघ विकत घेतला आहे. हा व्यवहार सुमारे १६,७०६ कोटी रुपयांना झाला. बिर्ला समूहासोबत अन्‍य समूहांचाही यामध्‍ये सहभाग आहे. या मोठ्या व्यवहारानंतर आता RCB चे नाव बदलणार का, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

RCB ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा संघ

RCB हा आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा संघ ठरला आहे. या विक्रमी व्‍यवहाराबात युनायटेड स्पिरीट्स लिमिटेडने(USL) ने निवेदनात म्हटले आहे की, "संचालक मंडळाच्या बैठकीनंतर कंपनीने आपली पूर्ण मालकीची उपकंपनी 'रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड' (RCSPL) मधील १०० टक्के हिस्सा विकण्यासाठी निश्चित करार केल्याची घोषणा केली आहे. यामध्‍ये आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोनची परपेच्युअल प्रायव्हेट इक्विटी स्ट्रॅटेजी यांचा समावेश असून, हा व्यवहार १६६.६ अब्ज रुपयांच्या रोख रकमेत झाला आहे.या व्यवहारामध्ये RCB च्या पुरुष आणि महिला (WPL) अशा दोन्ही संघांचा समावेश आहे."

अनन्‍या बिर्ला यांनी शेअर केली इंस्‍टा पोस्‍ट

RCB हा संघ २००८ मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून या स्पर्धेचा भाग आहे. गेल्या वर्षी, म्हणजे २०२५ मध्ये संघाने पहिल्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली. आता संघाची मालकी बदलल्यामुळे नाव बदलणार का? असा प्रश्न होता. पण, आदित्य बिर्ला समूहाच्या अनन्या बिर्ला यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. अनन्या यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट रीपोस्ट केली होती, ज्यामध्ये स्पष्ट केली की, संघाचे नाव बदलले जाणार नाही.

आरसीबीचे नाव कायम राहणार

USL ने स्पष्ट केले की, "RCSPL कडे आयपीएल आणि डब्ल्यूपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू फ्रँचायझीची मालकी आणि संचलन आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यावर, कन्सोर्टियमला RCSPL च्या मालकीद्वारे या दोन्ही फ्रँचायझी चालवण्याचे अधिकार मिळतील. या घोषणेसह, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी USL द्वारे सुरू करण्यात आलेला RCSPL चा धोरणात्मक आढावा देखील पूर्ण झाला आहे. यानंतर अनन्‍या बिर्ला यांनी केलेल्‍या इंस्‍टाग्राम पोस्‍टनंतर विक्रीनंतरही आरसीबीचे नाव कायम राहणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT