Ravindra Jadeja pudhari photo
स्पोर्ट्स

Ravindra Jadeja: क्रिकेटपेक्षा ॲक्टिंग कठीण; रवींद्र जडेजा असं का म्हणाला?

Anirudha Sankpal

Ravindra Jadeja On Acting: क्रिकेटपेक्षा ॲक्टिंग कठीण असल्याचे भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने एका कार्यक्रमात सांगितले. यावेळी यष्टीरक्षक रिषभ पंत उपस्थित होता. पंत आणि जडेजा यांची एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीच्या जाहिरातीमध्ये दोघांनी जॉली व पॉलीच्या भूमिका साकारल्या आहेत.

ब्रँड ॲम्बेसेडर झाल्याचा आनंद आहे. मात्र, जाहिरातीमध्ये काम करण्याचे दडपण होते. संवाद (डायलॉग) बोलताना खूप तारांबळ उडाली, असे पॉली साकारणाऱ्या जडेजाने सांगितले . भविष्यात ॲक्टिंग करण्याचा विचार आहे का, असे विचारले असता, माझ्याकडे अजून खूप क्रिकेट शिल्लक आहे. त्यामुळे सध्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले आहे, असे तो म्हणाला.

जॉली साकारणाऱ्या पंतने जाहिरात शुटिंग दरम्यानची जडेजासोबतची केमिस्ट्री सांगितली. जडेजा हा वरवर सीरियस वाटत असला तरी अजिबात गंभीर नाही. क्रिकेट असो किंवा अन्य कुठलेही काम, तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते. प्रत्येक काम किंवा घटना तुम्हाला खूप काही शिकवून जाते. मी सुद्धा ॲक्टिंगचा आनंद लुटताना खूप काही शिकण्याचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT