स्पोर्ट्स

Kumar Sangakkara: राजस्थान रॉयल्समधून द्रविडनं एका हंगामातच बाजार गुंडाळला... RR नं 'विश्वासू' माजी खेळाडूला कोच म्हणून पुन्हा आणलं

Kumar Sangakkara RR Coach: अवघ्या एका महिन्याच्या कार्यकाळानंतर राहुल द्रविड यांनी राजीनामा दिल्याने हा बदल करण्यात आला. क्रिकेट संचालक असलेल्या कुमार संगकारांवर प्रशिक्षक पदाची पुन्हा जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Anirudha Sankpal

Kumar Sangakkara Rajasthan Royals Head Coach:

राजस्थान रॉयल्सनं आगामी हंगामासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्समधील राहुल द्रविड यांचा कोचिंग कार्यकाळ हा अवघ्या एका महिन्यात संपला आहे. राजस्थान रॉयल्सनं आपला पूर्वीची विश्वासून कोच कुमार संगकाराकडं पुन्हा एकदा प्रशिक्षक पदाची सूत्रे सोपवली आहेत.

आता आयपीएल २०२६ च्या हंगामात कुमार संगकारा हा राजस्थान रॉयल्सचा कोच असणार आहे. त्याच्याकडे ही अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. तो संघाचा क्रिकेट संचालक म्हणून देखील काम पाहतो. गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्सची कामगिरी खराब झाली होती. ते नवव्या स्थानावर राहिले होते.

कुमार संगकारानं राजस्थान रॉयल्सचे २०२१ ते २०२४ असं प्रशिक्षक पद सांभाळलं होतं. त्याच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान आयपीएल २०२२ च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. तर २०२४ च्या हंगामात प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता. मात्र २०२५ मध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात राजस्थान रॉयल्सला अपयश आलं. राहुल द्रविडनं २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सचं प्रशिक्षक पद भूषवलं होतं. त्यांनी नवीन हंगामापूर्वी कोच पदाचा राजीनामा दिला.

राजस्थान रॉयल्सचे सहमालक मनोज बडले यांनी, 'कुमार संगकारा कोच म्हणून परतल्याचा आनंद असल्याचं सांगितलं. ते पुढे म्हणाले, 'संघाला आता काय गरजेचं आहे हे त्यांना माहिती आहे. त्यांनी यापूर्वी संघासोबत काम केलं आहे. त्यांना राजस्थान रॉयल्सचं कल्चर माहिती आहे. ते संघात स्थैर्य आणि समतोल आणतील. कुमार संगकारा हे आमचे कायमचे विश्वासू नेतृत्व राहिलं आहे. त्यांचा शांत स्वभाव, स्पष्टता आणि क्रिकेटमधील हुशारी पुढच्या टप्प्यात एक महत्वाचे योगदान ठरेल.'

राजस्थाननं आपल्या इतर कोचिंग स्टाफमध्ये देखील मोठे बदल केले आहेत. विक्रम राठोड यांना प्रमुख सहाय्यक कोच करण्यात आलं आहे. ते फलंदाजी आणि टॅक्टिकल प्रिपरेशन विभाग सांभाळतील. शेन बाँड हा गोलंदाजी प्रशिक्षक असणार आहे. तर ट्रेव्हर पेन्नी आणि सीड लाहिरी हे देखील सहाय्यक कोच म्हणून परत आले आहेत.

संगकारानं, 'मुख्य प्रशिक्षक म्हणून पुन्हा नियुक्ती झाल्यामुळं सन्मानित झाल्याची भावना आहे. मला गुणवान खेळाडूंसोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे. माझ्या सोबत जे इतर प्रशिक्षक आहेत त्यांना पाहून देखील आनंदीत झालो आहे. त्यांचा अनुभव नक्कीच कामी येईल. एक संघ म्हणून आम्हाला कोणत्या दिशेला जायचं आहे याची चांगली जाणीव सर्वांना आहे. आम्हाला संघात स्पष्टतेनं, झुंजार वृत्तीनं आणि एक ध्येय ठेवून काम करायचं आहे.' अशी प्रतिक्रिया दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT