भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे बंगळुरू येथील क्रिकेट अकादमीत जोरदार स्वागत करण्यात आले.  Rahul Dravid received a rousing reception
स्पोर्ट्स

राहुल द्रविड यांचे बेंगळुरूच्या अकादमीत जल्लोषात स्वागत

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे बंगळुरू येथील क्रिकेट अकादमीत जोरदार स्वागत करण्यात आले. द्रविड यांच्या सन्मानार्थ युवा खेळाडूंनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आणि ICC ट्रॉफी जिंकण्याची 11 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली.

द्रविड जेव्हा बंगळुरू क्रिकेट अकादमीत पोहोचले तेव्हा नवोदित खेळाडूंनी त्यांच्या सन्मानार्थ बॅट उंचावत गार्ड ऑफ ऑनलर दिला. यावेळी ॲकॅडमीच्या कोचिंग स्टाफने द्रविड यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. द्रविड यांनी ही उपस्थित लोकांना अभिवादन केले आणि सर्वांशी हस्तांदोलन केले.

द्रविड यांनी 1996 मध्ये भारतासाठी पदार्पण केले आणि 2012 पर्यंत देशाचे प्रतिनिधित्व केले. इतर सर्वांप्रमाणे द्रविडचेही विश्वविजेते बनण्याचे स्वप्न होते. मात्र, प्रशिक्षक म्हणून ते हे स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी ठरले.

द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2007 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेला होता, परंतु संघाच्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघ गट फेरीतूनच बाहेर पडला होता. द्रविड यांनी 2021 साली भारताच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात, संघाने 2022 T20 विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी, 2023 जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी आणि 2023 ODI विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती.

तेव्हा भारतीय संघाला यश मिळू शकले नसले तरी, कार्यकाळातील शेवटच्या स्पर्धेत संघाला विश्वविजेते बनवण्यात द्रविड यांना यश आले. द्रविड यांच्या नेतृत्वाखालीच संघाने गतवर्षी श्रीलंकेला हरवून आशिया चषक जिंकला होता. बंगळुरूमधील स्थानिक क्रिकेट अकादमीने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये द्रविड यांनी स्वागत स्वीकारत सर्वांचे आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT