मुझाराबानीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.  Pudhari Photo.
स्पोर्ट्स

IPL–PSL Row | पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा IPLवर जळफळाट! PSLला सोडचिठ्ठी दिलेल्या 'केकेआर'च्या गोलंदाजाला दिली धमकी

IPL–PSL Contract Row |आयपीएलमध्ये मुस्तफिजुरच्या जागी 'केकेआर'मध्ये मुझाराबानीची एन्ट्री

पुढारी वृत्तसेवा

आयपीएलमध्ये मिळणारा प्रचंड पैसा, जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी आणि जागतिक प्रसिद्धी यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पाकिस्तान सुपर लीगऐवजी आयपीएलमध्ये खेळण्याला प्राधान्य देतात.

IPL–PSL Contract Row

नवी दिल्‍ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझाराबानीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मुझाराबानीने पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधील आपला करार पूर्ण करण्याऐवजी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला मिरच्या झोंबल्या आहेत.

बांगलादेशच्‍या मुस्तफिजुरच्या जागी 'केकेआर'मध्ये मुझाराबानीची एन्ट्री

कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुस्तफिजुर रहमानच्या जागी ब्लेसिंग मुझाराबानीला संघात स्थान दिले आहे. बीसीसीआयच्या (BCCI) सूचनांनंतर मुस्तफिजुरला संघातून मुक्त करण्यात आले होते. भेदक बाऊन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या मुझाराबानीला गतविजेत्या 'केकेआर'ने आगामी हंगामासाठी आपल्या वेगवान गोलंदाजीची फळी मजबूत करण्यासाठी तातडीने स्वाक्षरी केली आहे.

कराराचे उल्लंघन केल्याचा PCB चा आरोप

मुझाराबानीच्या या निर्णयामुळे पीसीबीने थयथयाट सुरू केला आहे. पीएसएल हंगामासाठी मुझाराबानीला इस्लामाबाद युनायटेडने १.१ कोटी पाकिस्तानी रुपयांमध्ये (PKR 11 Million) आधीच करारबद्ध केले होते. 'जिओ सुपर'च्या रिपोर्टनुसार, आयपीएलची ऑफर मिळाल्यानंतर झिम्बाब्वेच्या या गोलंदाजाने पीएसएल करारातून माघार घेतली. पीसीबीच्या मते, हे कराराच्या अटींचे थेट उल्लंघन आहे. भविष्यात खेळाडूंनी अशा प्रकारे इतर लीगसाठी पीएसएल सोडल्यास लीगच्या प्रतिमेला धक्का लागू शकतो, हे रोखण्यासाठी बोर्ड आता कायदेशीर पावले उचलण्याचा विचार करत आहे.

मागील वर्षी कॉर्बिन बॉशवरून झाला होता वाद

खेळाडूंवरून आयपीएल आणि पीएसएलमध्ये संघर्ष होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या हंगामात, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॉर्बिन बॉश यानेही असेच केले होते. पेशावर झल्मीने त्याला 'डायमंड पिक' म्हणून निवडले होते, मात्र नंतर तो मुंबई इंडियन्समध्ये 'इंज्युरी रिप्लेसमेंट' म्हणून सामील झाला.

खेळाडू PSL ऐवजी IPL ला का देतात पसंती?

इंडियन प्रीमियर लीग ही जागतिक स्तरावर कमालीची लोकप्रिय आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर मानली जाते. आयपीएलमध्ये मिळणारा प्रचंड पैसा, जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी आणि जागतिक प्रसिद्धी यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पाकिस्तान सुपर लीगऐवजी आयपीएलमध्ये खेळण्याला प्राधान्य देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT