महिला बॉक्सर परवीन हुडाने सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली आहे. Pudhari
स्पोर्ट्स

Parveen Hooda Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये डबल धमाका, लोव्हलिनानंतर परवीन हुडानेही जिंकले सुवर्णपदक

आशियाई स्पर्धेत भारताच्या खात्यावर जमा झाले १३ वे सुवर्णपदक

पुढारी वृत्तसेवा

Parveen Hooda wins Gold Asian Games : आशियाई क्रीडा स्पर्धेत आजचा (दि. २ ऑक्टोबर) दिवस महिला बॉक्सरनी गाजवला. लोव्हलिनानंतर परवीन हुडानेही सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. तिने चायनीज तैपेईच्या निएन-चिन चेनचा ३-२ असा पराभव करून महिलांच्या ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. आशियाई स्पर्धेतील हे भारताचे १३ वे सुवर्णपदक ठरले आहे.

पहिल्या फेरीत परवीनची धडाकेबाज सुरुवात

सामन्याची सुरुवात परवीनने अत्यंत आक्रमक पद्धतीने केली. पाचही पंचांनी १०-९ अशा फरकाने परवीनच्या बाजूने कौल दिला. तैवानच्या चेनने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र परवीनने आक्रमक पवित्रा घेत तिला बॅकफूटवर ढकलले. पहिल्या फेरीत निर्विवाद वर्चस्व गाजवत परवीनने सामन्यावर मजबूत पकड मिळवली.

दुसऱ्या फेरीत चेनचे जोरदार कमबॅक

दुसऱ्या फेरीत परवीनने आपला बचाव अधिक मजबूत करण्यावर भर दिला. प्रतिस्पर्धी चेनने आपली रणनीती बदलली. तिने पंचांच्या अचूकतेवर भर दिला. पंचांनी ही फेरी ५-० अशी पूर्णपणे चेनच्या बाजूने दिली. पाचही पंचांनी या फेरीत चेनला १०-९ असे गुण दिले. त्यामुळे सामना अंतिम आणि निर्णायक फेरीत पोहोचला.

परवीन हुडाची सुवर्णपदकाला गवसणी

तिसऱ्या फेरीत परवीनने जोरदार कमबॅक केले. निर्णायक तिसऱ्या फेरीत दोन्ही बॉक्सर्सनी सुवर्णपदकासाठी सर्वस्व पणाला लावले. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रतिहल्ले चढवण्यात आले. अखेर पंचांचा अंतिम निर्णय आला अन् ३-२ अशा अत्यंत चुरशीच्या फरकाने परवीन हुडाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. आशियाई स्पर्धेतील हे भारताचे १३ वे सुवर्णपदक ठरले आहे.

लोव्हलिनाचाही 'गोल्डन पंच'

लोव्‍हलिना बोर्गोहेनने आज सकाळी आशियाई क्रीडा स्‍पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. महिलांच्‍या ७५ किलो वजनी गटातील बॉक्सिंग स्पर्धेत तिने चीनच्या बाओ झियीचा ५-० असा एकर्फी पराभव केला. अंतिम सामन्‍यात लोव्‍हलिनाने संयमाने चीनची प्रतिस्‍पर्धी बाओ झियाला केवळ रोखलेच नाही तर प्रभावी 'काउंटर-पंच' मारून प्रत्युत्तर दिले. बाओने अधिक आक्रमकपणे पुढे येण्याचा प्रयत्न केला; परंतु लोव्हलिना अधिक आत्मविश्वासपूर्ण आक्रमकपणे प्रभावी 'पंच' मारले. लोव्हलिनाने दुसरा राऊंड ४-१ ने जिंकला, ज्यामुळे एक राऊंड बाकी असताना तिला एकूण २-० अशी आघाडी मिळाली. यानंतर तिसऱ्या राऊंडवरही वर्चस्व राखले आणि एक दमदार विजय साकारला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT