Babar Azam Captaincy  Pudhari
स्पोर्ट्स

Babar Azam Captaincy : मसूदचा पत्ता कट, पाकिस्तान कसोटी संघाचे कर्णधारपद पुन्हा बाबरकडे

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर

पुढारी वृत्तसेवा

Babar Azam Captaincy : वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी आज (५ जुलै) पाकिस्तानचा संघ घोषित करण्यात आला. शान मसूदला कर्णधारपदावरून हटवून माजी कर्णधार बाबर आझम याच्याकडे पुन्हा एकदा संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बाबरचा कसोटी कर्णधार म्हणून यापूर्वीचा विक्रम खूपच खराब राहिला आहे. मसूदला ३ वर्षांनंतर कर्णधारपदावरून हटवण्यात आले; त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला १६ सामन्यांत १२ पराभवांचा सामना करावा लागला होता.

बांगलादेशकडून क्‍लिक स्‍वीपनंतर मसूदचा पत्ता कट

नुकतेच बांगलादेशकडून झालेल्या क्लिन स्वीपनंतर (Clean Sweep) मसूदला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. मसूदच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने दुसऱ्यांदा पाकिस्तानला क्लिन स्वीप दिले. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेकडूनही पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. मसूदच्या आधी बाबरच पाकिस्तानचा कर्णधार होता. मात्र, बाबर आझम स्वतः सध्या कसोटी क्रिकेटमध्ये खराब फॉर्मशी झगडत आहे.

वेस्ट इंडिज मालिकेसाठी १६ खेळाडूंची निवड

वेस्ट इंडिज मालिकेसाठी १६ खेळाडूंच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, निवडकर्त्यांनी इंग्लंड दौऱ्यासाठी सौद शकीलचा १७ वा सदस्य म्हणून संघात समावेश केला आहे; तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावरच निवडीसाठी उपलब्ध असेल. निवडकर्त्यांनी संघात चार अनकॅप्ड (आंतरराष्ट्रीय पदार्पण न केलेल्या) खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये डावखुरा फिरकीपटू अली उस्मान, फलंदाज मोहम्मद अवैस जफर, वेगवान गोलंदाज उबैद शाह आणि यष्टिरक्षक फलंदाज मुहम्मद गाजी गोरी यांचा समावेश आहे.

पाकिस्‍तान संघ वेस्ट इंडिज दौर्‍यांनतर जाणार इंग्लंडला

पाकिस्तान संघ या महिन्याच्या शेवटी दोन कसोटी सामने खेळण्यासाठी आधी वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. पहिली कसोटी २५-२९ जुलै दरम्यान तारुबा येथे, तर दुसरी कसोटी २-६ ऑगस्ट दरम्यान पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवली जाईल. यानंतर संघ तीन सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडला रवाना होईल. इंग्लंडविरुद्धचे सामने १९ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर दरम्यान लीड्स, लॉर्ड्स आणि बर्मिंगहॅम येथे होणार आहेत.

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पाकिस्तानचा संघ

बाबर आझम (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला फजल, अली उस्मान, अझान अवैस, इमाम उल हक, खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास, मोहम्मद अली, मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), मोहम्मद अवैस जफर, मुहम्मद गाजी गोरी (यष्टिरक्षक), साजिद खान, सलमान अली आगा, शान मसूद, उबैद शाह.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT