ढाका कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघ प्रचंड निराश असताना आता आणखी दोन मोठे झटके बसले आहेत.  Pudhari
स्पोर्ट्स

icc penalty on pakistan | पराभवानंतर आता पाकिस्तान क्रिकेट संघाला 'दुहेरी' झटका, ICC ने केली मोठी कारवाई

पाकिस्तानला 'जागतिक कसोटी अजिंक्यपद' गुणतालिकेत मोठा धक्का

पुढारी वृत्तसेवा

icc penalty on pakistan

बांगलादेशने ढाका येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा दारूण पराभव केला . पाकिस्तानचा बांगलादेशमधील हा पहिलाच कसोटी पराभव होता. या पराभवामुळे पाकिस्तान क्रिकेट संघ आधीच प्रचंड निराश असताना आता आणखी दोन मोठे झटके बसले आहेत. हे झटके त्यांना आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) दिले आहेत.

पाकिस्तानला 'जागतिक कसोटी अजिंक्यपद' गुणतालिकेत मोठा धक्का

आयसीसीने पाकिस्तानला 'जागतिक कसोटी अजिंक्यपद' (WTC) गुणतालिकेत मोठा धक्का दिला आहे. क्रिकेटच्या सर्वोच्च संस्थेने पाकिस्तानचे चक्क ८ डब्ल्यूटीसी गुण कापले आहेत. एवढेच नाही तर त्यांची ४० टक्के मॅच फी (सामना शुल्क) देखील आयसीसीने कापली असून, यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.

कारवाईमागील कारण काय?

आयसीसीने शुक्रवारी (दि.१५) जारी केलेल्‍या निवेदनात म्‍हटलं आहे की, पाकिस्तानी क्रिकेट संघाला ही शिक्षा धीम्या ओव्हर रेटमुळे (स्लो ओव्हर रेट) मिळाली आहे. पाकिस्तानचा संघ निर्धारित वेळेपेक्षा ८ ओव्हर्स मागे होता, ज्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानवर ४० टक्के मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला आहे, तसेच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ च्या सायकलमधील ८ गुण कापण्यात आले आहेत.

डब्ल्यूटीसी गुणतालिकेत आता केवळ ४ गुण

या कारवाईनंतर पाकिस्तानचे डब्ल्यूटीसी गुणतालिकेत आता केवळ ४ गुण उरले असून संघ थेट आठव्या स्थानावर घसरला आहे.

काय आहे नियम?

पाकिस्तानला ही शिक्षा मॅच रेफ्री जेफ क्रो यांनी दिली आहे. आयसीसीच्या निवेदनानुसार, पाकिस्तानने आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ चे उल्लंघन केले आहे. या नियमांतर्गत धीम्या ओव्हर रेटमुळे खेळाडूंवर प्रति ओव्हर ५ टक्के मॅच फीचा दंड आकारला जातो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या कलम १६.११.२ नुसार, संघ निर्धारित वेळेपेक्षा जितक्या ओव्हर्स मागे असेल, तितके गुण कापले जातात. पाकिस्तान संघ ८ ओव्हर्स मागे असल्याने त्यांचे ८ गुण कापण्यात आले. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने आपली चूक मान्य करत ही शिक्षा स्वीकारली आहे, त्यामुळे या प्रकरणावर कोणतीही अधिकृत सुनावणी घेण्याची गरज पडली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT