Gurnoor Brar NZ vs IND pudhari
स्पोर्ट्स

Gurnoor Brar NZ vs IND: गुरनूर बरारनं हद्द पार केली... अखेर विराटने हाताला धरून दूर केलं; गावसकरांनी कान उपटले, Video चर्चेत

Gurnoor Brar Tim Seifert Controversy: तरूण गुरनूर बरारने शांत किवींना डिवचलं... खिलाडूवृत्तीची चर्चा तर होणारच

Anirudha Sankpal

NZ vs IND 4th ODI Gurnoor Brar Controversy: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत ३३३ धावा ठोकल्या. न्यूझीलंडच्या सलामी जोडीने भारतीय वेगवान गोलंदाजांची चांगलीच परीक्षा पाहिली. सलामीला आलेल्या टीम सीफर्टने ४८ चेंडूत ५८ धावांची दमदार खेळी केली. त्याने अन् सलामीला आलेल्या विल यंग यांनी पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी रचली होती.

दरम्यान, मोठ्या कष्टाने ही जोडी भारताचा युवा क्रिकेटपटू गुरनूर बरारने फोडली. मात्र या विकेटचं सेलिब्रेशन करताना गुरनूर ब्रारने मर्यादा ओलांडल्याचं दिसलं. त्याच्या या आक्रमक अन् थोड्या वादग्रस्त सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. यात विराट कोहली देखील वरिष्ठ खेळाडूची भूमिका चांगल्या प्रकारे निभावताना दिसत आहे.

नेमकं काय झालं?

सामना सुरू असताना १२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गुरनूर बरारने एक शॉर्ट चेंडू टाकला. हा चेंडू पूल करण्याच्या नादात टीम सीफर्ट ५८ धावांवर झेलबाद झाला. यानंतर गुरनूर बरार हा टीम सीफर्टच्या दिशेने जात जोरदार आणि आक्रमक हावभाव केले. यामुळं नाराज झालेल्या सीफर्टने देखील गुरनूरसोबत शाब्दिक देवाण घेवाण केली. यावेळी विराट कोहलीने मध्यस्थी करत गुरनूर बरारला हाताला धरून तिथून बाजूला नेले अन् हे एस्कलेशन कमी केलं.

गावसकर यांनी कान उपटले

टीम सीफर्टने ४८ चेंडूत ५८ धावांची दमदार खेळी केली. त्यात ६ चौकार आणि ३ षटकार ठोकत सीफर्टने आपला आक्रमक अवतार दाखवला. त्याने वील यंग सोबत ८५ धावांची सलामी दिली. त्यानंतर वील यंगने १२५ धावांची शतकी खेळी करत न्यूझीलंडला ३३३ धावांपर्यंत पोहचवल.

दरम्यन, गुरनूर बरारने ज्या प्रकारे सीफर्ट बाद झाल्यावर पातळी सोडून सेलिब्रेशन केलं. ते पाहून समालोचक आणि माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी बरारचे चांगलेच कान उपटले. जर फलंदाजाला बाद केलं असेल तर त्याच्यासोबत वाद घालण्यात काय अर्थ आहे अशी विचारणा देखील त्यांनी केली. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळी भारताने न्यूझीलंडच्या ३३३ धावांच्या प्रत्युत्तरात १२ षटकात ४ बाद २८ धावा केल्या होत्या.

भारताचा प्लेईंग ११

भारताने चौथ्या वनडे सामन्यासाठी आपल्या संघात रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, नमन धीर, अक्षर पटेल, आकिब नबी, गुरनूर बरार, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश केला आहे. कर्णधार आणि सलामीवीर शुबमन गिल उपलब्ध नसल्यानं संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत असून सलामीला ऋतुराज गायकवाडचा संघात समावेश करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT