social media
स्पोर्ट्स

Sanjana Ganesan slams trollers : बुमराहच्या पोराची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली! पत्नी संजना गणेशन भडकली, म्हणाली; ‘आमचा मुलगा...’

मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यादरम्यान, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन तिचा मुलगा अंगदसोबत स्टेडियममध्ये दिसली. त्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यावर संजनाने प्रतिक्रिया दिली आहे.

रणजित गायकवाड

Jasprit Bumrah’s wife Sanjana Ganesan slams trollers after inappropriate comments about son Angad

मुंबई : जसप्रीत बुमराह याची पत्नी संजना गणेशन हिने सोशल मीडियावर आपल्या मुलाला, अंगदला, ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. ही घटना आयपीएल 2025 दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या सामन्यावेळी घडली, जेव्हा अंगद स्टँडमध्ये आपली आई संजना हिच्यासोबत सामना पाहत होता.

रविवारी (28 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात सामना झाला. मुंबईने हा सामना जिंकून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. दरम्यान या सामन्यावेळी एमआयचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा मुलगा अंगद मैदानात त्याची आई संजना गणेशन हिच्यासोबत उपस्थित होता. सामन्यादरम्यान हा क्षण चित्रीत झाला. मात्र, यावेळच्या अंगदच्या हावभावावरून त्याची सोशल मीडिया वापरकर्त्यांनी खिल्ली उडवली असल्याचे समोर आले आहे. यावर बुमराहची पत्नी संजना गणेशनने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली.

तिने स्टोरीमध्ये म्हटले की, ‘आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनाचा विषय नाही. त्याच्यावर अशा प्रकारे लक्ष केंद्रित करणे आणि त्याची खिल्ली उडवणे हे अत्यंत घृणास्पद आहे. जसप्रीत आणि मी, आमच्या मुलाला सोशल मीडियाच्या नकारात्मक परिणामांपासून वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करतो.’

संजनाने पुढे असेही नमूद केले की, ‘अंगद हा लहान मुलगा आहे आणि त्याच्या भावनांचा आदर केला जावा.’ तिने ट्रोलर्सना उद्देशून म्हटले की, त्यांनी अंगदच्या चेहऱ्यावरील हावभावांचा चुकीचा अर्थ काढून त्याला ‘मनोरंजनाचा विषय’ बनवणे थांबवावे.

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांचा मुलगा अंगद हा काहीवेळा आयपीएल सामन्यांदरम्यान स्टँडमध्ये आपल्या आईसोबत दिसतो. यापूर्वीही, आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात बुमराहने हेन्रिक क्लासेनची विकेट घेतल्यानंतर अंगद आणि संजना यांचा उत्साह व्हायरल झाला होता. अंगदचे स्टँडमधील काही क्षण, जसे की त्याचे हावभाव किंवा उत्साह, सोशल मीडियावर व्हायरल होतात. यापैकी काही प्रतिक्रिया सकारात्मक असतात, तर काहींनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे संजना संतापली आहे.

संजनाच्या या इन्स्टाग्राम स्टोरीनंतर अनेक चाहत्यांनी तिच्या भूमिकेचे समर्थन केले. काहींनी ट्रोलर्सच्या वागण्याला ‘असंवेदनशील’ आणि ‘निंदनीय’ म्हटले आहे. एक्सवर अनेक पोस्ट्समध्ये याबाबत चर्चा रंगली आहे.

संजनाने अंगदच्या गोपनीयतेच्या आणि भावनांच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर जोर दिला आहे, ज्यामुळे सेलिब्रिटींच्या मुलांना सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या घटनेने सोशल मीडिया वापरकर्त्यांना लहान मुलांचे हावभाव किंवा कृती यांचा चुकीचा अर्थ लावून त्यांचा गैरवापर करण्याला चाप बसेल की नाही येणा-या काळात स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT