Paris Paralympics मध्ये निषाद कुमारची उंच उडी; पटकावले रौप्यपदक  file photo
स्पोर्ट्स

Paris Paralympics मध्ये निषाद कुमारची उंच उडी; पटकावले रौप्यपदक

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये निषाद कुमारने उंच उडी टी ४७ स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक पटकावले. निषादने २.०४ मीटर उडी मारून या स्पर्धेतील भारतासाठी ७ वे पदक तर वैयक्तिक सलग दुसरे पॅरालिम्पिक रौप्य जिंकले.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय संघाच्या पदकांची संख्या सात झाली आहे. निषादच्या रौप्य पदकाने भारताच्या ताफ्यात भर पडली. संपूर्ण देशाची नजर निषादवर होती. त्याने सर्वोत्तम कामगिरी करत भारतासाठी पदक जिंकले. ॲथलेटिक्समधील भारताचे हे तिसरे पदक आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्येही निषादने देशासाठी रौप्य पदक जिंकले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT