Paralympic Games 2024
महिलांच्या 10 मीटर एअर रायफल (SH1) नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारताची अवनी लेखरा तिच्या प्रशिक्षक सुमा शिरूरसोबत. PHOTO PTI

"तुम्‍ही देशाचा अभिमान..." PM मोदींनी साधला पॅरालिम्पिक पदक विजेत्यांशी संवाद

अवनी लेखाला दिल्या आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छाही
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १ सप्‍टेंबर) पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या पॅरा ॲथलीट्सशी फोनवर बोलून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. पंतप्रधानांनी मोना अग्रवाल, प्रीती पाल, मनीष नरवाल आणि रुबिना फ्रान्सिस यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. ( Paralympic Games 2024 )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. "तुम्‍ही पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये उत्‍कृष्‍ट कामगिरी करत देशाचा अभिमान वाढवला आहे," असे त्‍यांनी सांगितले. मोदींनी अवनी लेखाला तिच्या आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छाही दिल्या. अवनी दुसऱ्या स्पर्धेत सहभागी होत असल्याने पंतप्रधानांशी फोनवर बोलू शकली नाही. ( Paralympic Games 2024 )

भारताने आतापर्यंत पटकावली पाच पदके

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत पाच पदके जिंकली आहेत. यामध्‍ये एका सुवर्णपदकाचा समावेश आहे. अवनी लेखरा हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. मोना अग्रवालने याच स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. मनीष नरवालने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एसएच1 प्रकारात रौप्य पदक जिंकले. याशिवाय प्रीती पालने महिलांच्या 100 मीटर T35 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि रुबिना फ्रान्सिसने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 मध्ये कांस्यपदक जिंकले आहे. ( Paralympic Games 2024 )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news