नीरज चोप्रा आणि सुमित अंतिल यांच्या तक्रारीनंतर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक नवल सिंह यांना भारतीय पॅरालिम्पिक समितीने (PCI) बडतर्फ केले आहे.  pudhari
स्पोर्ट्स

Neeraj Chopra Complaint | 'दारू पिऊन शिवीगाळ...' : नीरज चोप्रा, सुमित अंतिलच्या तक्रारीनंतर प्रशिक्षक नवल सिंह बडतर्फ

Neeraj Chopra Complaint | तातडीच्‍या बैठकीत निर्णय, खेळाडूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

पुढारी वृत्तसेवा

Neeraj Chopra Complaint

नवी दिल्‍ली : दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सुमित अंतिल यांच्या तक्रारीनंतर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक नवल सिंह यांना भारतीय पॅरालिम्पिक समितीने (PCI) बडतर्फ केले आहे. त्यांच्यावर मानसिक छळ, शिवीगाळ आणि दारू पिऊन अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला होता. तपासात प्राथमिक पुरावे मिळाल्यानंतर तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, खेळाडूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

नीरज चोप्रा, सुमति अंतिल यांच्‍या तक्रारीनंतर खळबळ

भारतीय ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सुमित अंतिल यांच्या तक्रारीमुळे क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक नवल सिंह यांना भारतीय पॅरालिम्पिक समितीने (PCI) तत्काळ प्रभावाने पदावरून हटवले आहे.

नेमकी तक्रार काय?

सुमित अंतिलने भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे (SAI) लेखी तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या तक्रारीत त्याने प्रशिक्षक नवल सिंह यांच्यावर मानसिक छळ, शिवीगाळ आणि अनुचित वर्तनाचे गंभीर आरोप लावले. प्रशिक्षक अनेकदा दारूच्या नशेत खेळाडूंचा अपमान करायचे आणि त्यांच्या कुटुंबाबद्दलही अपशब्द बोलायचे, असे सुमितने म्हटले आहे.

नीरज चोप्राची आक्रमक भूमिका

यातक्रारीनंतर नीरज चोप्रानेही उघडपणे आपली बाजू मांडली. नवल सिंह यांची विधाने 'अपमानास्‍पद' असल्याचे सांगत नीरजने म्हटले की, प्रशिक्षकाने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबासाठी अपमानास्पद भाषा वापरली होती. नीरजच्या मते, हे वर्तन खेळाची मर्यादा आणि मानवी शिष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडणारे होते.

भारतीय पॅरालिम्पिक समितीकडून तात्काळ कारवाई

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पॅरालिम्पिक समितीने तातडीने पावले उचलली. PCI चे अध्यक्ष देवेन्द्र झाझरिया यांनी माहिती दिली की, अनेक खेळाडूंकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि खेळाडूंना त्यांचे म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी देण्यात आली.

प्राथमिक टप्‍प्‍यात आरोप वस्‍तुनिष्‍ठ

तपासाच्या प्राथमिक टप्प्यात आरोप वस्‍तुनिष्‍ठ असल्याचे आढळल्यानंतर PCI ने आपत्कालीन बैठक बोलावली. खेळाडूंची सुरक्षा, खेळाचे मानक आणि शिस्त लक्षात घेऊन नवल सिंह यांना सर्व क्रीडा उपक्रमांतून तात्काळ हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. "कोणत्याही खेळाडूसोबत अशा प्रकारचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. खेळाचे वातावरण सुरक्षित राखणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे," असे PCI ने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT