भारताचा ऑलिम्पिक भालाफेकपटू नीरज चोप्राने एका आठवड्यात सलग दुसर्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. चेक प्रजासत्ताकातील ऑस्ट्राव्हा येथे झालेल्या गोल्डन स्पाइक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये त्याने ८५.२९ मीटरचा सर्वोत्तम थ्रो करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरलं. विशेष म्हणजे नीरचचे प्रशिक्षक व भालाफेकमधील विश्वविक्रमवीर जान झेलेझनी यांनी त्यांच्या कारकिर्दीत गोल्डन स्पाइक अॅथलेटिक्स स्पर्धेत तब्बल ९ वेळा विजेतेपद पटकावले आहे.
मागील दोनवेळा दुखापतीमुळे नीरज चोप्रा गोल्डन स्पाइक अॅथलेटिक्स स्पर्धला मुीकला होता. यंदा तो सहभागी झाला आणि अव्वल स्थानावर राहिला. नीरजने सुरुवात एका फाऊलने केली. यानंतर, त्याने दुसऱ्या प्रयत्नात ८३.४५ मीटरचा थ्रो केला. तिसऱ्या प्रयत्नात त्याने ८५.२९ मीटरचा थ्रो केला. याच कामगिरीच्या जोरावर त्याने विजेतेपदाला गवसणी घातली.
८८.१६ मीटर भालाफेक करत नीरज चोप्रा याने या वर्षीच्या पहिले विजेतेपद पॅरिस डायमंड लीगवर आपल्या नावाची मोहोर उमटवली. . २०२३ च्या लॉसनेनंतर डायमंड लीग स्पर्धेतील नीरजचा हा पहिलाच विजय ठरला होता. या स्पर्धेतील अंतिम फेरीत नीरजला ६ पैकी फक्त तीनच थ्रो करता आले. नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.१६ मीटर थ्रो करून चांगली सुरुवात केली. तेव्हा सर्वांच्या नजरा वेबरवर होत्या. त्याने त्याच्या सहा प्रयत्नांमध्ये नीरजवर दबाव कायम ठेवला. केशॉर्न वॉलकॉटने अँडरसन पीटर्सला हरवून टॉप थ्रोमध्ये स्थान मिळवले होते .नीरजचा दुसरा प्रयत्न देखील चांगला होता, त्याने ८५.१० मीटर थ्रो केला. यानंतर नीरजने सलग तीन फाऊल थ्रोची हॅटट्रिक केली. वेबर सुरुवातीला नीरजने ठेवलेला विक्रम ओलांडू शकला नाही. वेबर त्याच्या पहिल्या प्रयत्नापेक्षा चांगली कामगिरी करू शकला नाही आणि ८६.२० मीटरसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. २०२३ च्या लॉसनेनंतर डायमंड लीग स्पर्धेत नीरजचा हा पहिलाच विजय ठरला होता.