IND vs NZ Test Series Squad Update : न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकाIND vs NZ Test series squad update : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवड समितीने १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात मोठा बदल केला आहे. पुरुष निवड समितीने कुलदीप यादवला संघातून वगळले असून, त्याच्या जागी गुरनूर ब्रारची निवड केली आहे.
शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात बीसीसीआयने म्हटले आहे की, "पुरुष निवड समितीने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी वेलिंग्टन येथे सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात गुरनूर ब्रारचा समावेश केला आहे. कुलदीप यादवला कसोटी संघातून मुक्त करण्यात आले असून, तो आता भारतातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होईल." दरम्यान, गुरनूरची कसोटी संघात निवड झाल्याने तो पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी उपलब्ध नसेल. पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी त्याच्या जागी अन्य कोणाचीही निवड करण्यात आलेली नाही.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील पहिली कसोटी १९ नोव्हेंबरपासून वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्हवर सुरू होईल, तर दुसरी कसोटी २७ नोव्हेंबरपासून ख्राइस्टचर्चच्या हॅगली ओव्हलवर खेळवली जाईल.
याव्यतिरिक्त, यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत वेलिंग्टनमध्ये कसोटी संघात सामील झाला आहे. पंतसोबतच ध्रुव जुरेलचाही यष्टिरक्षक म्हणून अद्ययावत संघात समावेश करण्यात आला आहे.
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि गुरनूर ब्रार.
श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर/उपकर्णधार), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, रुतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, आणि कुमार कुशाग्र (विकेटकीपर).