एलिमिनेटर सामन्‍यात मुंबई इंडियन्‍सने २० धावांनी गुजरात टायटन्‍सचा पराभव केला. या पराभवानंतर शुभमन गिलच्‍या बहिणीला अश्रू अनावर झाले.  (Image source- X)
स्पोर्ट्स

Mumbai Indians vs Gujarat Titans | भावाचा पराभव जिव्हारी लागला... शुभमनच्‍या बहिणीच्‍या अश्रूंचा बांध फुटला!

गुजरातचे प्रशिक्षक आशिष नेहराच्‍या मुलालाही अश्रू अनावर

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Indians vs Gujarat Titans : यंदाच्‍या इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगाम आता अखेरच्‍या टप्‍प्‍यात आला आहे. शुक्रवारी (दि. ३० मे) एलिमिनेटर सामन्‍यात मुंबई इंडियन्‍सने २० धावांनी गुजरात टायटन्‍सचा पराभव केला. या पराभवामुळे गुजरातच्‍या संघाचे यंदाच्‍या हंगामातील आव्‍हान संपुष्‍टात आले आहे. सामना संपल्यानंतर, मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराचा मुलगा स्टँडमध्ये रडताना दिसला. तसेच शुभमन गिलची बहीण देखील तिचे अश्रू आवरू शकली नाही.

रोहितला मिळालेले जीवदान गुजरातला पडले भारी

शुक्रवारच्‍या सामन्‍यात मुंबई इंडियन्‍सने प्रथम फलंदाजी करतणाता २२९ धावांचे विशाल लक्ष्‍य गुजरातसमोर ठेवले. आता रविवारी अहमदाबादध्‍ये क्वालिफायर २ मध्ये मुंबईचा मुकाबला पंजाब किंग्जविरुद्ध होणार आहे. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना जेराल्ड कोएत्झीला दुसऱ्या षटकात रोहितला तीन धावांवर बाद करण्याची जबाबदारी सांभाळत होते. पुढच्या षटकात कुसल मेंडिसने १२ धावांवर खेळणार्‍या रोहितला बाद करण्याची संधी गमावली. याचा मोठा फटका गुजरातला बसला. रोहितने ५० चेंडूत ८१ धावा करत गुजरातच्‍या गोलंदाजांची धुलाई केली. त्‍याच्‍या खेळीने मुंबईने गुजरातसमोर २२९ धावांच्या विशाल लक्ष्य ठेवले. गुजरातच्‍या साई सुधरसनच्या जबरदस्त खेळीमुळे गुजरातच्‍या आशा जिवंत होत्‍या. मात्र अखेर गुजरातला मुंबई इंडियन्सकडून २० धावांनी पराभव पत्करावा लागलला. त्‍यामुळे र जरात टायटन्स आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला. २२९ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, पण मुंबईने गुजरातवर २० धावांनी विजय मिळवला.

शुभमनच्‍या बहिणीसह अशिष नेहराच्‍या मुलाही अश्रू अनावर

पराभवानंतर गुजरात टायटन्स संघासाठी हा एक मोठा पराभव होता. गुजरातच्‍या कुटुंबातील काही सदस्य आणि कर्मचाऱ्यांच्या भावनांना उधाण आले. सामना संपल्यानंतर, मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराचा मुलगा स्टँडमध्ये रडताना दिसला. शुभमन गिलची बहीण देखील तिचे अश्रू आवरू शकली नाही स्टँडमध्ये तिच्या शेजारी बसलेल्या लोकांनी तिला सांत्वन दिले.

सामन्‍यानंतर काय म्‍हणाला शुभमन ?

सामन्‍यानंतर बोलताना शुभमन म्‍हणाला की, "यंदाच्‍या आयपीएलमध्‍ये आमच्‍या संघाची वाटचाल योग्‍यरित्‍या सुरु होती. शेवटचे तीन-चार षटके आमच्या मनाप्रमाणे गेली नाहीत, पण तरीही तो चांगला खेळ होता. जेव्हा आम्ही तीन खेळाडू सोडतो तेव्हा ते निश्चितच सोपे नसते. गोलंदाजांना नियंत्रणात ठेवणे सोपे नव्हते आणि जेव्हा तुम्ही तीन झेल सोडता तेव्हा ते मदत करत नाही. या खेळपट्टीवर २१० धावा आमच्यासाठी योग्य ठरल्या असत्या".

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT