Mumbai Indians playoff chances: नुकत्याच झालेल्या सनराईजर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने २४३ धावा करूनही त्यांचा परभाव झाला. त्यांना एवढी मोठी धावसंख्या देखील डिफेंड करता आला नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात पराभवाची सवयच लागली आहे का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित होत आहे.
पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामातील अवस्था पाहून यंदा ते ग्रुप स्टेजमध्येच गटांगळ्या खाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई इंडियन्सचा आतापर्यंत झालेल्या ८ पैकी ६ सामन्यात पराभव झाला आहे. ते सध्या गुणतालिकेत तळातून दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना आतापर्यंत फक्त २ सामनेच जिंकता आले आहेत.
मात्र मुंबई इंडियन्स बाऊन्स बॅक करण्यात तरबेज आहे. त्यामुळे अजूनही त्यांच्या हार्ड कोअर फॅन्सना त्यांचा संघ प्ले ऑफमध्ये जाईल अशी आशा आहे. मात्र गुणांच्या गणितात मुंबईकडे फारशी संधी नाही. त्यांना आपल्या पराभूत होण्याच्या सवयीत बदल करून विजयाची सवय लावून घ्यावी लागणार आहे. तरच त्यांना प्ले ऑफ गाठता येईल.
सध्या मुंबई इंडियन्सचे ग्रुप स्टेजमधील फक्त ६ सामने शिल्लक आहेत. जर त्यांना प्ले ऑफचे स्वप्न सत्यात उतरवायचे असेल तर त्यांना ६ पैकी ६ सामन्यात विजय मिळवायला लागणार आहे. मुंबईसाठी ही आता करो या मरो स्थिती आहे. जर त्यांनी सहा पैकी सहा सामने जिंकले तर त्यांचे १६ गुण होतील. इतिहास पाहता १६ गुण हे टॉप ४ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पुरेसे आहेत. मात्र मुंबईने एकही सामना हरला किंवा सामना वॉश आऊट होऊन एका गुणावर समाधान मानावं लागलं तर मुंबईचा खेळ जागेवर खल्लास होणार आहे. मुंबई हे करू शकते का...? इतिहास पाहता त्यांनी एक दोन हंगामात सलग ४-५ सामने जिंकून हे करून दाखवले आहे.
जरी मुंबई इंडियन्सने सहा पैकी सहा सामने जिंकले तरी त्यांना नेट रनरेटच्या फॅक्टरकडे लक्ष द्यावे लागेल. सध्या त्यांचे नेट रनरेट (-०.७८४) इतके आहे. त्यामुळे उर्वरित ६ सामन्यातील प्रत्येक सामन्यात अटीतटीचा विजय मिळवून चालणार नाही. त्यांना आधीच्या पराभवांनी झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आश्वासक विजय मिळवणेच गरजेचे आहे.
मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या हंगामात त्यांची फलंदाजी फारशी डोकेदुखी ठरलेली नाही. मात्र गोलंदाजीत त्यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीत ती धार दिसत नाहीये. ट्रेंट बोल्ट देखील प्रभावी मारा करू शकत नाहीये. दीपक चाहर, शार्दुल ठाकूर आणि युवा खेळाडूंनी देखील यंदाच्या हंगामात निराशा केली आहे. रोहित दुखापतीमुळं खेळत नाहीये. त्यामुळं वरच्या फळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
होम ग्राऊंडवर मुंबई इंडियन्स नेहमी दादागिरी करत होती. मात्र यंदाच्या हंगामात त्यांना आपल्या होम ग्राऊंडवरच सपाटून मार खावा लागत आहे. विशेष म्हणजे २०२१ पासून मुंबईने त्यांच्या ३६ पैकी फक्त १४ सामने जिंकले आहेत. मुंबईचे आता ४ सामने हे प्रतिस्पर्ध्याच्या होम ग्राऊंडमध्ये खेळणार आहे.