Mahela Jayawardene Left MI pudhari
स्पोर्ट्स

Mahela Jayawardene Left MI: मुंबई इंडियन्सला नव्या हंगामासाठी शोधावा लागणार नवा प्रशिक्षक; जयवर्धनेने पुन्हा एकदा सोडली साथ

जयवर्धनेने मुख्य प्रशिक्षक म्हणून मुंबई इंडियन्सला तीन आयपीएल टायटल मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली होती.

Anirudha Sankpal

Mahela Jayawardene Left MI: महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक पद सोडले आहे. आयपीएल २०२७ पूर्वी त्याने हा निर्णय घेतला आहे. जयवर्धने मुंबई इंडियन्स सोबतच्या आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये गेल्या दोन हंगामात संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं होते. यापूर्वी त्याने २०१७ ते २०२२ पर्यंत मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक पद निभावली होतं.

मुंबई इंडियन्सने आज प्रेस रिलीजमध्ये सांगितलं की, 'मुंबई इंडियन्स आज घोषणा करत आहे की महेला जयवर्धने आपले मुख्य प्रशिक्षकाचे पद सोडत आहे. वन फॅमिलीसोबतची त्यांची एक दशकाची साथ आता संपुष्टात येणार आहे.'

MI मध्ये मोलाची भूमिका

जयवर्धनेने मुख्य प्रशिक्षक म्हणून मुंबई इंडियन्सला तीन आयपीएल टायटल मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली होती. मुंबई इंडियन्सने जयवर्धनेने त्यांच्या फ्रेंचायजीचे कल्चर तयार करणे आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या कार्यकाळात शिस्त, सहकार्य आणि संघ प्रथम हा अप्रोच निर्माण केला.

जयवर्धनने पुन्हा मुंबई इंडियन्स का सोडली? आता मुंबईचा पुढचा प्रशिक्षक कोण असणार हे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. जयवर्धने मुंबई इंडियन्ससोबत जवळपास एक दशक आहे. त्या काळात त्याला खेळाडू, कोचिंग स्टाफ, चाहते आणि फ्रेंचायजी मालक नीता आणि आकाश अंबानी यांचा पाठिंबा आणि विश्वास मिळाल्याबद्दल आभार मानले आहेत.

काय म्हणाला जयवर्धने

जयवर्धने म्हणाला, 'मुंबई इंडियन्स गेल्या एका दशकापासून माझ्या प्रवासाचा एक महत्वाचा भाग राहिला आहे. खेळाडू, कोचिंग स्टाफ, वन फॅमिलीचा जबरदस्त पाठिंबा आणि चाहत्यांचा असा अनुभव मिळाला आहे की तो मी आयुष्यभर सांभाळून ठेवणार आहे.

एकत्र आम्ही काही स्मरणीय क्षण अनुभवले. आव्हानांचा मुकाबला केला आणि आम्ही असं काही तयार केलं आहे की त्याच्यावर आम्हाला खूप गर्व आहे. इतक्या वर्षात विश्वास, साथ आणि मैत्रीसाठी मी नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांचे मनापासून आभार मानते. आम्ही एकत्र मिळून जे साध्य केलं त्याच्यावर मला गर्व आहे. MI साठी माझ्या ह्रदयात कायम एक खास जागा असेल. मी संघाला पुढच्या यशासाठी शुभेच्छा देतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT