IND vs PAK Mohsin Naqvi file photo
स्पोर्ट्स

IND vs PAK: 'ट्रॉफी चोर' पुन्हा एकदा पळाला! मोहसिन नकवीने सामना संपण्यापूर्वीच सोडले मैदान, Video व्हायरल!

Mohsin Naqvi stadium exit: टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताकडून पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव होत असतानाच कोलंबोच्या स्टेडियममधून एक असा व्हिडिओ समोर आला, ज्याने सोशल मीडियावर चेष्टा सुरू आहे.

मोहन कारंडे

India vs Pakistan Mohsin Naqvi stadium exit:

कोलंबो: टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताकडून पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव होत असतानाच कोलंबोच्या स्टेडियममधून एक असा व्हिडिओ समोर आला, ज्याने सोशल मीडियावर चेष्टा सुरू आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि 'आशिया चषक ट्रॉफी चोरणारे' म्हणून ट्रोल होणारे मोहसिन नकवी सामना संपण्यापूर्वीच स्टेडियम सोडून पळताना दिसले. पाकिस्तानचा पराभव त्यांना सहन झाला नाही.

पराभवाच्या भीतीने नकवींनी अर्धवट सामना सोडला?

जेव्हा भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि १२ व्या षटकात मोहम्मद नवाजची विकेट पडली, तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या ७७/५ अशी होती. विजयाची आशा मावळताना पाहून मोहसिन नकवी व्हीव्हीआयपी बॉक्समधून उठले आणि थेट आपल्या गाडीकडे धावले. पीटीआयने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये ते सामना संपण्याच्या बराच वेळ आधी स्टेडियमबाहेर जाताना दिसत आहेत. सोशल मीडियावर याला 'पराभवाच्या भीतीने पळ काढणे' असे म्हटले आहे.

जय शाह यांच्यासोबतच्या चर्चेची होती अपेक्षा

नकवी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याशी संबंध सुधारण्यासाठी आणि संवाद साधण्याच्या इराद्याने स्टेडियममध्ये आले होते. मात्र, दोघेही एकत्र दिसले नाहीत. नकवी यांनी श्रीलंकेच्या क्रिकेट अधिकाऱ्यांची भेट घेतली खरी, पण भारताविरुद्धची त्यांची जुनी विधाने आणि आशिया चषक ट्रॉफीच्या वादामुळे ते भारतीय चाहत्यांच्या निशाण्यावर राहिले. पाकिस्तानचा हा पराभव मोहसिन नकवी यांनी पाकिस्तान क्रिकेटसाठी काहीही विशेष काम केले नसल्याचा पुरावाच आहे.

ट्रॉफी वादापासून प्रकरणाला सुरुवात

मोहसिन नकवी यांचे वादांशी जुने नाते आहे. गेल्या वर्षी आशिया चषकादरम्यान त्यांनी तेव्हा खळबळ उडवून दिली होती, जेव्हा भारतीय संघाने त्यांच्या हातातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर नकवी कथितरीत्या ट्रॉफी घेऊन मैदानाबाहेर निघून गेले होते. अलीकडेच भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या धमक्यांमागेही नकवी यांच्या नेतृत्वाखालील पीसीबीचाच हात असल्याचे मानले जात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT