कुलदीप यादववर जाहीरपणे टीका केल्यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने कर्णधार अक्षर पटेलवर नाराजी व्‍यक्‍त केली आहे.  pudhari
स्पोर्ट्स

IPL 2026 | 'एक परिपक्व कर्णधार कधीही...'; अक्षर पटेलच्या 'त्या' वागण्यावर माजी क्रिकेटपटूने उपस्थित केले प्रश्न!

१२ पैकी ७ सामने गमावल्यामुळे दिल्ली संघावर दडपण कायम

पुढारी वृत्तसेवा

Mohammad Kaif slams Axar Patel’s leadership in IPL 2026

आयपीएल २०२६ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा प्रवास चढ-उतारांचा राहिला आहे. अशातच, कर्णधार अक्षर पटेलने आपला सहकारी खेळाडू कुलदीप यादववर जाहीरपणे टीका केल्यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

अक्षर आणि कुलदीपच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह

सोमवारी धरमशाला येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यात दिल्लीने पंजाब किंग्सवर तीन गडी राखून विजय मिळवला आणि आपल्या प्ले-ऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, १२ पैकी ७ सामने गमावल्यामुळे दिल्लीवर अद्याप दडपण आहे. विशेषतः अक्षर आणि कुलदीप या फिरकी जोडीच्या कामगिरीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

काय म्हणाला मोहम्मद कैफ?

चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर अक्षर पटेलने कुलदीप यादवच्या खराब फॉर्मबद्दल भाष्य केले होते. कैफच्या मते, एका कर्णधाराने असे करणे चुकीचे आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना कैफ म्हणाला, "एक परिपक्व कर्णधार कधीही आपल्या खेळाडूचे नाव जाहीरपणे घेत नाही किंवा त्याला कमी लेखत नाही. तो उघडपणे कोणावरही दोषारोप करत नाही. मी समजू शकतो की कुलदीपसाठी हा हंगाम कठीण जात आहे—त्याने अपेक्षित गोलंदाजी केलेली नाही आणि त्याला विकेट्सही मिळालेल्या नाहीत. पण जेव्हापासून तो दिल्ली संघात सामील झाला आहे, तेव्हापासून त्याने स्वतःला सिद्ध केले आहे."

कैफने केली कुलदीपची पाठराखण

कैफने पुढे कुलदीपची पाठराखण करताना सांगितले की, कुलदीपने केवळ आयपीएलमध्येच नव्हे, तर भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तो म्हणाला, "हा हंगाम त्याच्यासाठी शांत असेल, पण अशा वेळी खेळाडूचे नाव घेण्याऐवजी 'एक संघ म्हणून आमची कामगिरी चांगली झाली नाही' असे म्हणायला हवे होते."

अक्षर पटेलची झुंजार खेळी

टीका होत असतानाच, अक्षर पटेलने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात कर्णधाराला साजेसा खेळ केला. २११ धावांचा पाठलाग करताना दिल्लीची अवस्था ३ बाद ३३ अशी बिकट झाली होती. मात्र, अक्षरने ३० चेंडूत ५६ धावांची धडाकेबाज खेळी केली आणि डेव्हिड मिलरसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.

अक्षरने केले संघाच्‍या संघाच्या जिद्दीचे कौतुक

सामन्यानंतर बोलताना अक्षर म्हणाला: "आमचा संघ चांगला आहे, आम्ही क्रिकेटही चांगले खेळतोय, फक्त महत्त्वाच्या क्षणी आम्हाला विजय मिळवता येत नव्हता. आज ज्या प्रकारे आम्ही खेळलो त्याबद्दल मला आनंद आहे आणि हीच लय आम्ही कायम राखू अशी आशा आहे. प्रकारचे क्रिकेट आम्ही खेळत आहोत आणि आमची 'बेंच स्ट्रेंथ' पाहता, दिल्लीचे भविष्य सुरक्षित हातांत आहे. कठीण परिस्थितीत तरुण खेळाडू जबाबदारी घेत आहेत, हे शुभसंकेत आहेत."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT