पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर  Pudhari
स्पोर्ट्स

Mohammad Amir British Citizenship : "माझ्यासाठी पाकिस्तानचा अध्याय संपला" : क्रिकेटपटू मोहम्‍मद आमीर आता 'ब्रिटिश नागरिक'

पाकिस्‍तान क्रिकेट संघातील आंतरराष्ट्रीय पुनरागमनाच्या चर्चांना पूर्णविराम

पुढारी वृत्तसेवा

Mohammad Amir British Citizenship : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पुनरागमनाच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पाकिस्तान संघातील पुनरागमनाचे दरवाजे आता आपल्यासाठी पूर्णपणे बंद झाल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. पत्नीमार्फत आमीरला ब्रिटनचे नागरिकत्व आणि ब्रिटिश पासपोर्ट मिळाला आहे.

आता मी 'पाकिस्तानी स्थानिक खेळाडू' नाही

आपल्या या नव्या स्टेटसमुळे आता काउंटी चॅम्पियनशिप आणि 'द हंड्रेड' सारख्या स्पर्धांमध्ये आपली गणना 'पाकिस्तानी स्थानिक खेळाडू' म्हणून होऊ शकत नाही, असे आमीरने स्पष्ट केले आहे. इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्थानिक खेळाडू म्हणून नोंदणी करताना खेळाडूंना दुसऱ्या कोणत्याही देशाकडून स्थानिक खेळाडू म्हणून खेळणार नाही, अशा करारावर स्वाक्षरी करावी लागते.

मी आता ब्रिटिश नागरिक

क्रिकेट युट्यूब चॅनेल 'फुरकान भट्टी'ला दिलेल्या मुलाखतीत आमीर म्हणाला, "मी आता ब्रिटिश नागरिक आहे. जेव्हा तुम्ही काउंटी चॅम्पियनशिप किंवा 'द हंड्रेड' सारख्या स्पर्धांमध्ये स्थानिक खेळाडू म्हणून खेळता, तेव्हा तुम्हाला एका करारावर स्वाक्षरी करावी लागते, ज्यानुसार तुम्ही दुसऱ्या देशाकडून स्थानिक खेळाडू म्हणून खेळू शकत नाही. त्यामुळे माझं पाकिस्तानचं प्रकरण आता कायमचं बंद झालं आहे."

आमीरने पाकिस्तानकडून केले तीन विश्वचषक स्पर्धेत प्रतिनिधित्व

आमीरने पाकिस्तानकडून तीन विश्वचषक स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते. आंतरराष्‍ट्रीय कारकीर्दीत त्‍याने ३६ कसोटी सामन्‍यांमध्‍ये ११९ विकेत, ६१ वनडे सामन्‍यात ८१ विकेट तर ६२ टी-२० सामन्‍यात ७१ विकेट घेतल्‍या आहेत. २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकात तो १७ बळी घेत पाकिस्तानचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता.पाकिस्तानने जिंकलेल्या २००९ च्या टी-२० विश्वचषक आणि २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयात आमीरने मोलाची भूमिका बजावली होती. याशिवाय २०१९ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ५ विकेट घेतल्‍या होत्‍या.

पाकिस्‍तान क्रिकेट संघातील आंतरराष्ट्रीय पुनरागमनाच्या चर्चांना पूर्णविराम

२०२७ च्या वनडे विश्वचषक स्‍पर्धेत आमीरचा पाकिस्‍तानच्‍या क्रिकेट संघात समावेश होणार अशी चर्चा होती.मात्र त्‍याने आता ब्रिटिश नागरिकत्वामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र ब्रिटीश नागरिकत्‍वामुळे त्याला काउंटी आणि जगभरातील फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये आपली कारकीर्द अधिक काळ सुरू ठेवता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT