Mithun Manhas Virendra Sehwag Wife  pudhari photo
स्पोर्ट्स

Mithun Manhas : सेहवागच्या पत्नीसोबत अफेअरची चर्चा... नुतन BCCI अध्यक्ष मिथुन मन्हास यांची संपत्ती का आहे चर्चेत?

Anirudha Sankpal

Mithun Manhas Virendra Sehwag Wife :

भारताची माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची नवीन बीसीसीआय अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. रॉजर बिन्नी यांच्यानंतर आता ते बीसीसीआयचा नवे अध्यक्ष असणार आहेत. मन्हास बीसीसीआय अध्यक्ष झाल्यानंतर ते अचानक चर्चेत आले आहेत. त्यांचे भारताकडूनचे क्रिकेटिंग करिअर फारसे प्रभावी नाही. त्यातच आता त्यांचा विरेंद्र सेहवागच्या पत्नीसोबतचा जुना फोटो व्हायरल झाला. त्यानंतर या दोघांमध्ये अफेअर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्यान, मिथुन मन्हास याची संपत्ती किती आहे याबाबत देखील उत्सुकता वाढली आहे.

मिथुन मन्हास यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जरी फारशी प्रभावी नसली तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा होता. आता त्यांची बीसीसीआय अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांची २०२५ मध्ये नेट वेल्थ अंदाजे १० ते १२ कोटी रूपये इतकी आहे. त्याचा मुख्य आर्थिक स्त्रोत हा देशांतर्गत क्रिकेट मधून मिळणारे मानधन हा आहे. याचबरोबर त्यांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये काही करार देखील केले होते.

मिथुन यांच्या नावावर ९ हजार धावा

मिथुन मन्हास यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९७९ रोजी जम्मू इथं झाला. विशेष म्हणजे ते जम्मू काश्मीरमधून येणारे पहिले बीसीसीआय अध्यक्ष झाले आहेत. त्यांची क्रिकेट कारकीर्द ही २० वर्षाची आहे. त्यांनी १९९७ ते २०१७ पर्यंत व्यावसायिक क्रिकेट खेळलं. यात त्यांनी १५७ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ९ हजार ७१४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी लीस्ट ए आणि टी २० सामने देखील खेळले आहेत. दिल्लीनं २००७-८ ची रणजी ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी मन्हास हे कर्णधार होते. त्यांनी आयपीएलमध्ये देखील ५७.५६ च्या सरासरीने ९२१ धावा केल्या आहेत. त्यांनी दिल्ली कॅपिटल्स, पुणे वॉरियर्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व केलं आहे.

त्यांनी जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील काम केलं असून त्यांनी बीसीसीआयच्या अनेक AGM ला देखील हजेरी लावली आहे.

जुने फोटो व्हायरल अन्...

दरम्यान, बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांचा आणि विरेंद्र सेहवागची पत्नी आरतीचा एक जुना फोटो व्हायरल झाला आहे. विरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. ते लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं देखील बोललं जात आहे.

त्यातच मिथुन आणि आरती यांचा जुना फोटो व्हायरल झाल्यानं या दोघांमध्ये अफेअर सुरू झालं आहे का अशी चर्चा देखील जोर धरू लागली आहे. काही सोशल मीडिया अकाऊंट्सनी या दोघांच अफेअर सुरू असल्याचा दावा केला आहे. मिथुन आणि सेहवाग हे अनेक वर्षापासूनचे चांगले मित्र आहेत.

आरती अन् मिथुन यांचे हे फोटो २०२१ मधील असल्याचं समोर आलं आहे. या फोटोनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. मात्र याबाबत दोघांकडूनही कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT