T20 WC semifinal
T20 विश्‍वचषक स्‍पर्धेत आज सेमी फायनलमध्‍ये भारत आणि गतविजेता इंग्लंड आमने-सामने येतील.  File photo
स्पोर्ट्स

भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायलनवर पावसाचे ढग!

पुढारी वृत्तसेवा

T-20 विश्‍वचषक स्‍पर्धेत आज पहिली सेमी फायलनमध्‍ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्‍तानचा पराभव करत फायनलमध्‍ये धडक मारली आहे. आता सर्वांचे लक्ष भारत आणि गतविजेता इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सेमी फायनलकडे लागले आहे. मात्र गयानामध्‍ये पावसाचे ढग दाटल्‍याने क्रिकेटप्रेमींचा हिरमूड होण्‍याची शक्‍यता आहे. जाणून घेवूया गयाना येथील हवामानविषयी...

गयानामधील हवामान कसे आहे?

गयाना येथील ब्रायन लारा स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना रंगणार आहे. सामन्यातील नाणेफेक भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे. गयानामध्ये सध्या पाऊस पडत नाही, परंतु ढगाळ वातावरण कायम आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, स्थानिक वेळेनुसार गयाना येथे आज सकाळी 10:30 वाजता पावसाची शक्‍यता ३३ टक्‍के आहे तर दुपारी एकपासून गयानामध्‍ये पावसाची शक्‍यता ६० टक्‍के आहे. हवामानाचा अंदाज बरोबर आला तर सामना पावसामुळे वाहून जाऊ शकतो.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होणार आहे. निकालासाठी हा सामना किमान १० षटकांचा होणे आवश्‍यक आहे. पावसाचा अडथळा आला तर आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेने दिलेली २५० अतिरिक्त मिनिटे सामना अधिकाऱ्यांना निकाल आणि विजेता ठरविण्‍यासाठी दिली जाणार आहेत.

ICC T20 WC : सेमी फायनलचा सामना रद्द झाला तर?

भारत विरुद्ध इंग्लंड सेमी फायनल सामन्‍याला पावसाचा फटका बसला तर दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण दिला जाणार आहे. त्‍यामुळे सध्‍या गुणतालिकेत अव्वल स्‍थानावर असणार्‍या टीम इंडियाला त्‍याचा फायदा होणार असून, पावसामुळे सामना रद्द झाला तर भारतीय संघ थेट फायनलमध्‍ये धडक मारणार आहे.

SCROLL FOR NEXT