KL Rahul NZ vs IND pudhari
स्पोर्ट्स

KL Rahul NZ vs IND : केएल राहुलचं न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक अर्धशतक; भारताच्या कसोटी इतिहासात हे पहिल्यांदाच घडलंय

Anirudha Sankpal

KL Rahul NZ vs IND : केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दमदार फलंदाजी करत भारताला पुन्हा सामन्यावर पकड निर्माण करून दिली. न्यूझीलंडचा पहिला डाव ३६८ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने दुसरा दिवसअखेर १ बाद १५९ धावा केल्या. भारत अजूनही २०९ धावांनी पिछाडीवर आहे.

भारताने आपल्या पहिल्या डावाची दमदार सुरूवात केली. सलामीवीर यशस्वी जयस्वालने ८५ धावांची आक्रमक खेळी केली. त्याचे शतक थोडक्यात हुकले. तर केएल राहुलने शांत आणि संयमी फलंदाजी करत एका बाजूने त्याला चांगली साथ दिली होती. यशस्वी बाद झाल्यानंतर केएल राहुलनेच डावाची धुरा आपल्या खांद्यावर घेत देवदत्त पडिक्कलच्या साथीने संघाला १५० धावांचा टप्पा पार करून दिला. दरम्यान, केएल राहुलने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले.

केएल अजूनही नाबाद

केएल राहुलचे हे अर्धशतक ऐतिहासिक ठरलं. ३४ वर्षाच्या केएल राहुलने २०१४ मध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. तो आपला ७१ वा कसोटी सामना खेळत आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडमधील त्याचा हा पहिलाच कसोटी सामना आहे. न्यूझीलंडमधील आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात केएल राहुलने अर्धशतकी खेळी केली आहे. दिवसअखेर तो ५२ धावा करून नाबाद राहिला. आता तिसऱ्या दिवशी तो हे अर्धशतक शतकात कनव्हर्ट करणार का याची उत्सुकता आहे.

केएल ठरला पहिला भारतीय सलामीवीर

केएल राहुलची ही न्यूझीलंडमधील फिफ्टी खास आहे. आता केएल राहुल सेना (SENA) देशात किमान एक अर्धशतक ठोकणारा पहिला सलामीवीर ठरला आहे. भारताला सुनिल गावसकर आणि विरेंद्र सेहवाग सारखे अनेक दिग्गज सलामीवीर मिळाले आहेत. मात्र दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात या चार देशात अर्धशतकी खेळी करणारा केएल राहुल हा भारताचा पहिला सलामीवीर ठरला हे विशेष!

टी२० क्रिकेटमध्ये हा कारनामा अभिषेक शर्माच्या नावावर आहे. तर वनडेमध्ये ५ भारतीय सलामीवीरांना सेना देशात किमान एक अर्धशतक ठोकले आहे. यात सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, सौरव गांगुली आणि शिखर धवन यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT