Dwayne Bravo Video Viral Pudhari
स्पोर्ट्स

Dwayne Bravo Video: 'घरी दोन मुली होत्या...' पत्रकार परिषदेत ड्वेन ब्राव्होची जीभ घसरली, KKRच्या गोटात खळबळ

Dwayne Bravo controversy IPL 2026: KKR मेंटर ड्वेन ब्राव्होचे माइक ऑन असताना केलेले वक्तव्य व्हायरल झाले असून वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यावरून सोशल मीडियावर टीका होत आहे.

Rahul Shelke

Dwayne Bravo controversy IPL 2026: IPL 2026 सुरू होण्याच्या काही दिवस आधीच Kolkata Knight Riders मध्ये खळबळ उडाली आहे. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि KKR चा मेंटर ड्वेन ब्राव्होचे एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावरून वाद निर्माण झाला आहे.

एका मीडिया इव्हेंटदरम्यान हा प्रसंग घडला. या कार्यक्रमात KKR चे हेड कोच अभिषेक नायर, असिस्टंट कोच शेन वॉटसन आणि कर्णधार अजिंक्य रहाणे उपस्थित होते. यावेळी बोलताना ब्राव्हो म्हणाला की, “जेव्हा मला फोन आला, तेव्हा माझ्या घरी दोन मुली होत्या…” तो पुढे बोलणार इतक्यात अजिंक्यने त्याला इशारा दिला की माइक सुरू आहे.

हे लक्षात येताच ब्राव्हो काहीसा अस्वस्थ झाला आणि त्याला लगेच आपली चूक लक्षात आली. मात्र तोपर्यंत हा संवाद रेकॉर्ड झाला होता आणि काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ब्राव्होवर टीकेची झोड उठली आहे. काही सोशल मीडिया युजर्सनी त्याच्या वक्तव्याला महिलांविषयी अयोग्य आणि गैरजबाबदार असल्याचे म्हटले आहे. मात्र, ब्राव्हो ज्या “दोन मुली” म्हणाला, त्या नेमक्या कोण होत्या याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे केवळ एका क्लिपवरून निष्कर्ष काढणे योग्य नाही, असेही काही जणांचे मत आहे.

क्रिकेटविश्वात अशा प्रकारचे वाद नवीन नाहीत. याआधी हार्दिक पांड्यालाही एका टीव्ही शोमधील वक्तव्यामुळे मोठ्या वादाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी त्याने सार्वजनिकरित्या माफी मागत आपला हेतू कुणालाही दुखावण्याचा नव्हता, असे स्पष्ट केले होते.

या घटनेतून पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे की, क्रिकेटर्स नेहमीच कॅमेऱ्यांच्या आणि माइकच्या नजरेत असतात. त्यामुळे त्याचा प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो आणि एक छोटीशी चुकही महागात पडू शकते.

आता या प्रकरणावर ब्राव्हो कोणती भूमिका घेतो किंवा स्पष्टीकरण देतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र IPL 2026 सुरू होण्याआधीच या वादामुळे KKR च्या गोटात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT