Kieron Pollard pudhari
स्पोर्ट्स

Kieron Pollard MI Head Coach: पांड्याचा मित्र झाला मुंबई इंडियन्सचा हेड कोच... MI च्याच माजी खेळाडू पोलार्डवर मोठी जबाबदारी

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ५ आयपीएल टायटल जिंकले आहेत. त्यात पोलार्डची देखील मोठी भूमिका राहिली आहे.

Anirudha Sankpal

Kieron Pollard MI Head Coach: महेला जयवर्धनने मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यानंतर आता मुंबई इंडियन्सचे नव्या हंगामासाठी नवा गडी शोधला आहे. मुंबई इंडियन्सने आपलाच माजी खेळाडू कायरन पोलार्ड याच्याकडे मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवली आहे. विशेष म्हणजे कर्णधार हार्दिक पांड्याचा पोलार्ड हा चांगला मित्र आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ५ आयपीएल टायटल जिंकले आहेत. त्यात पोलार्डची देखील मोठी भूमिका राहिली आहे.

हा तर माझा सन्मान

मुंबईचा हेड कोच झाल्यावर पोलार्ड म्हणाला की, 'मुंबई इंडियन्सच्या हेड कोचची जबाबदारी मिळणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. मुंबई इंडियन्स माझे आयुष्य आणि कारकिर्दीतील एक महत्वाचा भाग आहे. हा संघ, त्यातील खेळाडू आणि पल्टनसोबत माझे जे नाते आहे ते मला खूप मोलाचे वाटते.'

पोलार्ड पुढे म्हणाला, 'एक खेळाडू आणि आता कोच म्हणून या प्रवासाचा अनुभव घेतल्यानंतर मला कळालं आहे की मुंबई इंडियन्स कोणत्या गोष्टीसाठी ओळखली जाते. आणि या जर्सीला रिप्रेझेंट करण्यासोबतच काय जबाबदारी येते याची देखील मला जाणीव आहे. आकाश अंबानी आणि पूर्ण एमआय परिवाराने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. मी खेळाडू, सपोर्ट स्टाफसोबत काम करण्यास, संघाचा वारसा पुढे चालवण्यास उत्सुक आहे.

पोलीला सर्व माहिती आहे..

मुंबई इंडियन्सच्या सह मालक नीता अंबानी यांनी, 'पोलार्ड २२ व्या वर्षी मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला होता. गेल्या १६ वर्षापासून तो आमच्या परिवाराचा महत्वाचा भाग आहे. खेळाडू म्हणून त्याने आम्हाला अनेक स्मरणीय क्षण दिले आहेत. आता एक कोच म्हणून तो आपला अनुभव, जज्बा आणि खेळाचे सखोल ज्ञान सर्वांसोबत शेअर करणार आहे.

नीता अंबानी पुढे म्हणाल्या, 'आम्ही त्याला हेड कोच म्हणून एक नवी जबाबदारी देत आहोत. ही जबाबदारी स्विकारताना त्याला पाहणे हा आनंदाचा क्षण आहे. पोलीला माहिती आहे की मुंबई इंडियन्सची जर्सी घालणे म्हणजे काय असते. मला विश्वास आहे की तो ही भूमिका देखील कमिटमेंट, विश्वास आणि दृढ विश्वासाने निभावेल. संघाचा पुढचा अध्याय लिहिण्यासाठी आम्ही त्याला शुभेच्छा देतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT