Kavya Maran Wedding pudhari
स्पोर्ट्स

Kavya Maran Wedding: अखेर ठरलं! अनिरूद्धच्या काकांनी लीक केली बातमी... SRH ची मालकीण काव्या मारन अडकणार लग्नाच्या बेडीत

Anirudha Sankpal

Kavya Maran Wedding: आयपीएलमधील सनराईजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनच्या लग्नाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. प्रसिद्ध म्युजिक कंपोजर अनिरूद्ध रविचंदरसोबत काव्या लग्न करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र अचानक काव्याच्या लग्नाची चर्चा का सुरू झाली याबाबत सर्वांना कुतूहल आहे.

काकांनी फोडली बातमी

अनिरूद्धचे काका अभिनेते वाय. जी. महेंद्र यांनी काव्या आणि अनिरूद्धच्या लग्नाची बातमी फोडली. ते केपीटीव्हीला मुलाखत देत होते. त्यावेळी वाय जी महेंद्र यांना अनुरूद्धच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी 'अनिरूद्ध हा एक चांगला मुलगा असून मला मिळालेल्या माहितीनुसार त्याचे लग्न काव्या मारन सोबत जवळपास निश्चित झालं आहे. तो एका मोठ्या कुटुंबाशी जोडला जाणार आहे. मी त्याचे त्याबद्दल अभिनंदन करतो.'

महेंद्र पुढे म्हणाले की, काव्या काही सामान्य मुलगी नाहीये. तिच्याकडे आयपीएलचा एवढा मोठा संघ सांभाळण्याची क्षमता आहे. तिच्यामध्ये उद्योगाचे गुण हे तिच्या वडिलांकडून मिळाले आहेत. या दोघांची जोडी चांगली असून दोघांनी एकत्र मिळून एक म्युझिकल बिजनेस सुरू करण्यात काही हरकत नाही.

कधी होणार लग्न?

आता काव्या आणि अनिरूद्ध यांचे लग्न कधी होणार याबाबत जर उत्सुकता असेल तर या दोघांचे लग्न कधी होणार याबाबत अजून विश्वसनीय माहिती समोर आलेली नाही.

मात्र यापूर्वी देखील काव्या आणि अनिरूद्ध यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. ते एकमेकांना डेट करत आहे अशा बातम्या देखील आल्या होत्या. त्यावेळी काव्या मारन आणि अनिरूद्ध यादोघांकडून याबाबत एक चकार शब्द देखील काढण्यात आला नव्हता. २०२५ मध्ये रेडिटवर एक पोस्ट व्हायरल झाली होती. त्यात दावा करण्यात आला होता की काव्या आणि अनिरूद्ध एकमेकांना एका वर्षापासून डेट करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT