Kapil Dev Controversial Statement On Gautam Gambhir : भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांनी भारताचा सध्याचा कोच गौतम गंभीरवर टीका केली आहे. त्यांनी गौतम गंभीरच्या काम करण्याच्या पद्धतीवर देखील टीका केली. कपिल देव यांनी आजच्या घडीला मुख्य प्रशिक्षकाची भूमिका ही कोचिंग देण्यापेक्षा संघाचे मॅन मॅनेजमेंट करण्याची अधिक झाली आहे.
दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताला २-० असा पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर गंभीरच्या प्रशिक्षक पदावर प्रश्निचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. खेळाडूंना सतत रोटेट करण्याच्या आणि कामचलाऊ खेळाडूंना संधी देण्याच्या निर्णयावर टीका होत आहे. आता कपिल देव यांनी सध्या क्रिकेट जगतात कोच या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला जातो असं सांगितलं.
कपिल देव हे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आयसीसीच्या शताब्दी चर्चासत्रात बोलत होते. त्यावेळी त्यांनी आज तो शब्द ज्याला कोच म्हणतात... हा कोच शब्द सर्वसाधारण झाला आहे. गौतम गंभीर कोच होऊ शकत नाही. तो संघाचा मॅनेजर असू शकतो.'
कपिल देव म्हणाले, 'ज्यावेळी तुम्ही कोच म्हणता त्यावेळी तो शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना ज्यांच्याकडून खेळ शिकतो तो व्यक्ती कोच असतो. माझ्यासाठी ते लोक कोच आहेत. ते मला शिकवतात. गौतम गंभीर कोच कसा असू शकतो. गौतम लेग स्पिनर किंवा विकेटकिपरचा कोच कसा होऊ शकतो.'
ते पुढे म्हणाले, 'मला वाटते की तुम्हाला मॅनेज करावं लागेल. हे खूप महत्वाचं आहे. एक मॅनेजर म्हणून तुम्ही खेळाडूंना प्रोत्साहित करू शकता. तुम्ही फक्त तेच करू शकता कारण ज्यावेळी तुम्ही मॅनेजर बनता त्यावेळी युवा खेळाडू तुमच्यावर विश्वास ठेवतात.'
कपिल देव यांनी जर सुनील गावसकर या काळात क्रिकेट खेळत असते तर ते टी २० चे सर्वोकृष्ट फलंदाज असते असं देखील वक्तव्य केलं. ते म्हणाले, 'मला क्रिकेटमधील सर्वकाही आवडतं. टी २०, टी १० वनेड सगळं आवडतं. मी कायम एक गोष्ट सांगतो ती म्हणजे जर सुनिल गावसकर या काळात क्रिकेट खेळत असते तर ते टी २० चे सर्वोकृष्ट खेळाडू झाले असते.
कपिल देव पुढे म्हणाले, 'ज्या लोकांचा डिफेन्स मजबूत असतो त्यांना हिटिंग करणं खूप सोपं जातं. डिफेन्स सर्वात अवघड असतो. त्यामुळं मी कायम म्हणतो की ज्याचा डिफेन्स चांगला असतो तो कायम आक्रमक होऊन खेळू शकतो. कारण त्याच्याजवळ थोडा जास्त वेळ असतो.'