IPL Reel Viral Video Pudhari
स्पोर्ट्स

Watch Video: IPL सामन्यादरम्यान मुलीला रील बनवणं पडलं महागात; झालं 70,000 रुपयांचं नुकसान, नेमकं काय घडलं?

IPL Reel Viral Video: IPL सामन्यात रील बनवताना एका मुलीची 70 हजारांची अंगठी हरवली. ट्रेंड फॉलो करताना अंगठी हातातून सुटून खाली पडली.

पुढारी वृत्तसेवा

IPL Reel Viral Video: आजकाल IPL म्हणजे फक्त क्रिकेट नाही, तर सोशल मीडियावर व्हायरल होण्याची एक मोठी संधीही असते. पण कधी कधी रील बनवण्याची क्रेझ महागातही पडू शकते आणि असाच एक प्रकार IPL सामन्या दरम्यान घडला आहे.

रील बनवताना घडली दुर्घटना

IPL 2026 मधील पंजाब किंग्स आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यातील सामना मुल्लानपूर स्टेडियममध्ये खेळला गेला. सामना संपल्यानंतर स्टेडियममध्ये बसलेल्या एका लेडी फॅनने रील बनवण्याचा निर्णय घेतला. ती एका ट्रेंडला फॉलो करत होती आणि ज्यामध्ये अंगठी हवेत उडवायची होती.

शुट करताना अंगठी गायब

रील शूट करताना ती अंगठी हवेत फेकण्याचा फक्त अभिनय करणार होती…पण अचानक तिच्या हातातून अंगठी खरोखरच सुटली. क्षणातच तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब झाला.
ती आणि तिच्यासोबत असलेले लोक सीटखाली, आसपास सगळीकडे अंगठी शोधू लागले.

70 हजारांचा फटका

ही अंगठी साधी नव्हती. तिची किंमत सुमारे 70 हजार रुपये होती. बराच वेळ शोधूनही अंगठी सापडली नाही, त्यामुळे तिचं मोठं नुकसान झालं.

सोशल मीडियावर मदतीची विनंती

या मुलीने स्वतः हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने भावनिक पोस्टमध्ये लिहिलं “70 हजारांचं नुकसान झालं आहे. जर स्टेडियममधील कोणी हा व्हिडिओ पाहत असेल, तर कृपया माझी अंगठी शोधून द्या.”

आजच्या सोशल मीडियाच्या युगात रील्स, व्हिडिओ बनवणं सामान्य झालं आहे. पण अशा गोष्टी करताना थोडी काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT