Abhishek Sharma  Pudhari
स्पोर्ट्स

Abhishek Sharma Video: अभिषेक शर्माने भरमैदानात दिल्या शिव्या? मॅच फीमध्ये मोठी कपात; शिस्तभंगाची कारवाई होणार

Abhishek Sharma Breach IPL Code of Conduct: अभिषेक शर्मावर आयपीएलच्या नियमभंगामुळे 25% मॅच फी कपात आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. नेमकं काय घडलं पाहा.

पुढारी वृत्तसेवा

Abhishek Sharma Breach IPL Code of Conduct: सनरायझर्स हैदराबादचा युवा आणि आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मावर आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीमध्ये 25 टक्के कपात करण्यात आली असून त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे.

अभिषेकने आपली चूक मान्य करत रेफरीने दिलेली शिक्षा स्वीकारली आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, अभिषेक शर्माने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.3 चे उल्लंघन केले आहे, जे अपमानास्पद किंवा अश्लील भाषेच्या वापराशी संबंधित आहे.

21 चेंडूत 48 धावा; दमदार सुरुवात

या सामन्यात अभिषेक शर्मा याने शानदार फलंदाजी करत केवळ 21 चेंडूत 48 धावांची तुफानी खेळी केली. त्याने ट्रॅव्हिस हेड सोबत मिळून संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी अवघ्या 34 चेंडूत 82 धावांची भागीदारी करत कोलकाताच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला.

यानंतर हेनरिक क्लासेन याने 52 धावांची संयमी पण प्रभावी खेळी करत संघाला भक्कम स्थितीत पोहोचवले. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 8 विकेट्स गमावत 226 धावांचा मोठा डोंगर उभा केला.

कोलकाताची फलंदाजी कोसळली

227 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाइट राइडर्सची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. अंगक्रिश रघुवंशी याने 52 धावा करत सामना सावरण्याचा प्रयत्न केला, तर उपकर्णधार रिंकू सिंग याने 35 धावांची खेळी केली. मात्र इतर फलंदाजांनी साथ न दिल्याने आणि खराब रन-आउटमुळे कोलकात्याचा संपूर्ण संघ अवघ्या 161 धावांत गुंडाळला गेला.

गोलंदाजांची कमाल, हैदराबादची मोठी विजय

सनरायझर्सच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामन्यावर पकड मजबूत ठेवली. जयदेव उनाडकट याने 3 षटकांत फक्त 21 धावा देत 3 विकेट घेतल्या.

याशिवाय इशान मलिंगा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर हर्ष दुबे यानेही एक विकेट घेत योगदान दिले. या शानदार कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबादने 65 धावांनी मोठा विजय मिळवला.

विजयातही अभिषेकवर कारवाईची सावली

हैदराबादने हा सामना जिंकला असला, तरी अभिषेक शर्मावर झालेली दंडात्मक कारवाई ही या विजयात थोडीशी निराशाजनक ठरली. उत्कृष्ट खेळी करुनही शिस्तभंगामुळे त्याला शिक्षा भोगावी लागली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT