स्पोर्ट्स

IPL 2026 Points Table : दिमाखदार विजयानंतरही मुंबई इंडियन्स खूप मागे, कोहलीच्या RCBचे वर्चस्व

IPL 2026 : नेट रनरेटचे गणित आणि आरसीबीची सरशी

रणजित गायकवाड

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) च्या थराराला दिमाखात सुरुवात झाली असून, रविवारी झालेल्या दुसऱ्या हाय-व्होल्टेज सामन्यात पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर ६ गडी राखून मात केली. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने विजयाने मोहीम सुरू केली असली, तरी गुणतालिकेत मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) अव्वल स्थान कायम राखले आहे.

मुंबई आणि कोलकाता यांच्यातील हा सामना अत्यंत चुरशीचा आणि धावांचा पाऊस पाडणारा ठरला. या विजयामुळे मुंबई इंडियन्सच्या खात्यात २ गुणांची भर पडली आहे, तर कोलकाता नाईट रायडर्सला पराभवामुळे गुणांचे नुकसान सोसावे लागले. मुंबईने विजयाचा श्रीगणेशा केला असला तरी नेट रनरेटच्या गणितामुळे त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

नेट रनरेटचे गणित आणि आरसीबीची सरशी

आयपीएल २०२६ च्या पहिल्या सामन्यात आरसीबीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मोठा विजय मिळवला होता. त्या विजयानंतर आरसीबीच्या खात्यातही २ गुण जमा झाले आहेत. अशा प्रकारे मुंबई आणि आरसीबी या दोन्ही संघांचे समान २ गुण असतानाही, नेट रनरेटमधील मोठ्या फरकामुळे आरसीबी पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.

हैदराबादविरुद्धच्या विजयानंतर आरसीबीचा नेट रनरेट +2.907 इतका प्रभावी आहे. दुसरीकडे, कोलकाताविरुद्ध विजय मिळवल्यानंतर मुंबईचा नेट रनरेट +0.687 नोंदवला गेला आहे. दोन्ही संघांच्या रनरेटमध्ये मोठी तफावत असल्याने सध्या तरी आरसीबीने गुणतालिकेच्या शिखरावर कब्जा केला आहे.

मुंबई-कोलकाता सामन्यानंतरची गुणतालिका

चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे सामने अद्याप व्हायचे असल्याने त्यांचे गुणतालिकेतील खाते उघडणे बाकी आहे. आगामी सामन्यांनंतर गुणतालिकेतील हे चित्र अधिक स्पष्ट होत जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT