मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाल्यामुळे इंडियन प्रीमियर लीग 2025 पुन्हा सुरू होऊ शकते. दोन्ही देशांमधील तणावामुळे लीगचा 18 वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. आता जर परिस्थिती सुधारली तर आयपीएलचे उर्वरीत सामने पुढील आठवड्यापासून खेळवण्यास सुरुवात होऊ शकते.
स्थगितीपूर्वी, लीगमध्ये 57 सामने खेळले गेले होते. तर धर्मशाला येथील 58 वा सामना युद्धजन्या परिस्थितीमुळे मधूनच थांबला. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हा सामना खेळला जात होता. तथापि, सामना पुन्हा खेळवला जाईल की दोन्ही संघांना 1-1 गुण दिले जातील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आयपीएल 2025 मध्ये अजूनही 16 सामने खेळायचे आहेत. यामध्ये 12 लीग स्टेज सामन्याचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, उर्वरित 16 सामन्यांचे वेळापत्रक काय असेल ते लवकरच जाहीर केले जाणार आहे.