स्पोर्ट्स

Mumbai Indians IPL 2025 : मुंबई इंडियन्सचा नादच खुळा! एकदा जिंकायला लागलं की सुट्टीच देत नाही

IPLच्या या हंगामात Mumbai Indiansने विजयी चौकार लगावला असून चॅम्पियनच्या शर्यतीत रंगत आणली आहे

रणजित गायकवाड

IPL 2025 Mumbai Indians Comeback MI Team Won Back to Back 4 Matches

मुंबई : आयपीएलच्या सर्व 10 संघांपैकी, जर कोणत्याही संघात सध्या सर्वात जास्त आनंदाचे वातावरण असेल तर ते मुंबई इंडियन्समध्ये आहे. ज्या धमाकेदार खेळीच्या जोरावर या संघाने तळापासून कमबॅक केले ते कौतुकास्पद असेच आहे. सुरुवातीला एमआय संघ नवव्या स्थानावर संघर्ष करत होता. पण काही दिवसांतच त्यांनी थेट तिसऱ्या स्थानावर कब्जा केला आहे. मुंबईच्या या विजयी मोहिमेने उर्वरित संघांसाठी धोक्याची घंटा नक्कीच वाजवली आहे. मुंबई आता प्लेऑफ गाठणार की नाही याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

मुंबई इंडियन्स संघ 9व्या स्थानावरून थेट 3ऱ्या स्थानी

12 एप्रिल रोजीच हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघ पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर होता. त्यावेळी सर्वांना वाटले की आता हा संघ तळताच राहिल. प्लेऑफमध्ये पोहोचणे ही कल्पना खूप दूरची होती, पण त्यानंतर संघाने जबरदस्त कमबॅक केले आणि ते विजयी रथावर स्वार झाले. 23 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर संघ थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर असलेले संघ आता क्रमवारीत खाली घसरले आहेत. विशेष म्हणजे सध्या चार संघांच्या खात्यात 10 गुण आहेत. पण या सर्वांमध्ये, मुंबई संघ अव्वल स्थानावर आहे, कारण त्याचा नेट रन रेट खूप सुधारला आहे.

सूर्या-हिटमॅनला फॉर्म गवसला

हार्दिक पंड्या धावा करत होता आणि तो संघाला विजय मिळवून देण्याच्या मोहिमेवर होता, पण आता एमआयचे स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झाली आहे. ही मुंबईसाठी जमेची बाजू ठरली आहे. यादरम्यान, जसप्रीत बुमराह कदाचित जास्त विकेट्स घेत नसेल पण त्याच्याकडून जास्त धावाही खर्च होत नाहियेत. दुसरीकडे ट्रेंट बोल्ट त्याचा मारा उत्तम प्रकारे करत आहे. अशा परिस्थितीत, गोलंदाजी असो वा फलंदाजी, संघ प्रत्येक बाबतीत चांगली कामगिरी करताना दिसत आहे. मुंबई संघाचे हेच वैशिष्ट्य आहे की जर त्यांनी एकदा एकदा विजयाची चव चाखली तर सतत जिंकणे ही त्याची सवय बनते.

अगामी सामने महत्त्वाचे

मुंबई इंडियन्स तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली असली तरी, आगामी सामने त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. येणाऱ्या काळात त्यांना लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या संघाशी सामना करावा लागणार आहे. या लढती अजिबात सोप्या नसतील. अशा परिस्थितीत, संघाला गेल्या तीन-चार सामन्यांप्रमाणेच खेळत राहावे लागेल. जर असे झाले तर संघ पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्याचा दावेदार असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT