नेमबाज मनू भाकर 
स्पोर्ट्स

Paris Olympics 2024 : पदकांची हॅट्ट्रिक करण्यास मनू सज्ज

पुढारी वृत्तसेवा

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक पटकावत इतिहास घडविणारी भारताची युवा नेमबाज मनू भाकर आता पदकांची हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने 25 मीटर एअर पिस्टलच्या पात्रता फेरीत दमदार कामगिरी करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. पात्रता फेरीत ती 590 गुण मिळवून दुसर्‍या स्थानी राहिली. हंगेरीची मेजर वरणिका 592 गुणांसह अव्वल स्थानावर राहिली. मात्र, भारताच्या इशा सिंगला अंतिम आठमध्ये स्थान मिळवता आले नाही. ती 18 व्या स्थानी राहिली. 3 ऑगस्ट (शनिवार) रोजी होणार्‍या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी अव्वल 8 मध्ये स्थान मिळवायचे होते. जे मनूने साध्य केले आणि एकाच ऑलिम्पिकमध्ये तीन स्पर्धांची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.

25 मीटर एअर पिस्टलच्या पात्र फेरीत 40 नेमबाजांनी सहभाग नोंदवला. यात 20-20 चे दोन गट करण्यात आले होते. इशा सिंगला पहिल्या, तर मनू भाकरला दुसर्‍या गटात स्थान मिळाले. पहिला इशाच्या गटाची प्रीसिजन फेरी पार पडली. ज्यात 30 शॉटस् खेळून ती 291 गुणांसह तिसर्‍या स्थानी राहिली. त्यानंतर मनूच्या गटाची प्रीसिजन फेरी खेळवण्यात आली. ज्यात 30 शॉटस् अखेर मनूने 294 गुणांची कमाई केली आणि एकूण 40 जणांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले. दुसर्‍या गटाच्या प्रीसिजन फेरीनंतर इशा 10 व्या स्थानी घसरली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT