India vs New Zealand 1st Test Wellington drawn : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अनेक नव्या विक्रमांची नोंद करणारा भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वेलिंग्टन कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला आहे. आज सामन्याच्या पाचव्या दिवशी १५ षटके शिल्लक असतानाच दोन्ही संघांनी सहमतीने सामना संपवण्याचा निर्णय घेतला. भारताला विजयासाठी आणखी पाच बळींची (विकेट्सची) गरज होती आणि होती; मात्र, त्या पाच विकेट्स मिळवणे कठीण वाटत होते. ही परिस्थिती पाहता, भारतीय संघाने सामना अनिर्णित ठेवणेच पसंत केले. न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावात अत्यंत जिद्दीने फलंदाजी केली. दुसर्या डावात भारतीय गोलंदाजांना प्रत्येक विकेट मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. परिणामी, भारताच्या हातून विजयाची संधी निसटली आणि न्यूझीलंड हा कसोटी सामना वाचवण्यात अनिर्णित (ड्रॉ) करण्यात यशस्वी ठरला.
पहिल्या कसोटीत अनपेक्षितपणे फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टी ठरली. सामना सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीवर भरपूर हिरवे गवत होते. यामुळे पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व राहील असे वाटले होते. मात्र हा अंदाज अल्पकाळ खरा ठरला. भारताला काही लवकर बळीही मिळाले. मात्र, पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर ही खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन ठरली.
हेन्री निकोल्स आणि ग्लेन फिलिप्ससारख्या फलंदाजांनी मोठ्या धावा करत न्यूझीलंडला ३५० धावांच्या पलीकडे नेले. भारताकडून जसप्रीत बुमराहने ४ बळी मिळवले, तर आकाश दीपने ३ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. त्यानंतर खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिकच अनुकूल झाली.
भारताने पहिल्या डावात फलंदाजीचा धडाका लावत ७२० धावांचा डोंगर उभारला. न्यूझीलंडमधील कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वोच्च धावसंख्या ठरला. केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी शानदार शतके झळकावली, तर शुभमन गिल ९८ धावांवर बाद झाल्यामुळे त्याचे शतक हुकले. यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल यांनीही अर्धशतकी खेळी केली. ग्लेन फिलिप्सने शतकानंतर गोलंदाजीतही ३ बळी मिळवले. या सामन्यात न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांना विकेट मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. तसेच पहिल्या डावात भारतीय फलंदाजीन अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
पाचव्या दिवशी डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी चिवट फलंदाजीचे प्रदर्शन केले. या जोडीने मिळून २५८ चेंडूंचा सामना केला आणि ६३ धावा केल्या. मिचेल १८६ चेंडूंमध्ये ४९ धावांवर नाबाद राहिला. यामध्ये त्याने चार चौकार आणि एक षटकार फटकावला. ग्लेन फिलिप्स १२६ चेंडूंमध्ये २६ धावांवर नाबाद राहिला. यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता. १२० षटकांच्या अखेरीस न्यूझीलंडची धावसंख्या ५ बाद २३९ अशी होती. दिवसाच्या खेळात जास्तीत जास्त १५ षटके शिल्लक असताना, पंचांनी दोन्ही संघांशी चर्चा केली आणि परस्पर संमतीने सामना अनिर्णित (ड्रॉ) घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला.