पॅरिस ऑलिम्पिक २०२४ लक्ष्य सेन  file photo
स्पोर्ट्स

Paris Olympics 2024 | बॅडमिंटनमधील पदकाचे 'लक्ष्‍य'...! लक्ष्य सेनची प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा तिसरा सामना जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीविरूद्ध झाला. लक्ष्य सेनने पहिला सेट २१-१८ तर दुसरा सेट २१-१२ असा जिंकून प्री क्वार्टर फायनल (उपउपांत्यपूर्व फेरी) मध्ये धडक मारली. पी. व्ही. सिंधू पाठोपाठ लक्ष्य सेननेही अंतिम १६ मध्ये आपले स्थान पक्के केल्याने भारतीयांना बॅडमिंटमधील पदकाच्या आशा आणखीन वाढल्या आहेत.

पहिला गेम अत्‍यंत चुरशीचा, अखेर लक्ष्‍य सेनने मारली बाजी

सामन्‍यातील पहिला गेम अत्‍यंत चुरशीचा झाला. लक्ष्य सेन आणि जोनाथन क्रिस्टी यांनी प्रत्‍येक गुणांसाठी अप्रतिम बॅडमिंटनचे प्रदर्शन केले. लक्ष्य सेनने पहिल्या गेममध्ये जोनाथन क्रिस्टीचा २१-१८ असा पराभव केला. हा खेळ २८ मिनिटे चालला. यानंतर मात्र लक्ष्‍यने कोणतीही चूक न करता सलग दोन गुण घेत दोन गुणांची निर्णायक आघाडी घेतली आणि पहिला गेम २१-१८ असा आपल्‍या नावावर केला. यानंतर क्रिस्टीच्या चुका अचूक हेरत त्याने आपली आघाडी कायम ठेवली आणि दुसरा गेम २१-१२ गुणांनी आपल्या नावावर करत प्री क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. विशेष म्हणजे क्रिस्टी विरूद्ध याआधी झालेल्या चारही सामन्यात लक्ष्य सेनला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विजय मिळवत या चारही सामन्याचे अपयश त्याने धुवून काढले.

लक्ष्य सेनचा पहिला सामना शनिवारी केविन कॉर्डनशी झाला होता. यामध्ये त्याने २-० असा विजय मिळवला होता, तर त्याचा दुसरा सामना जागतिक क्रमवारीत ५२ व्या क्रमांकाचा खेळाडू ज्युलियन कॅरेजीविरुद्ध झाला. हा सामनाही त्याने जिंकला. लक्ष्यचा तिसरा सामना आज इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीशी झाला. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. लक्ष्य हा उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. लक्ष्यने येथूनच बॅडमिंटन खेळून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली आहे.

पहिल्‍या गेममध्‍ये निर्विवाद वर्चस्‍व, दुसर्‍या गेममध्‍ये दमदार कमबॅक

सामन्‍याच्‍या पहिल्‍या गेममध्‍ये लक्ष्‍य सेनने निर्विवादीत वर्चस्‍व ठेवले. त्‍याने पहिला गेम २१-८ असा आपल्‍या नावावर केला होता. दुसर्‍या गेममध्‍ये कॉर्डनने आपल्‍या नावाला साजेसा खेळ करत दमदार कमबॅक करत आघाडी घेतली. मात्र युवा लक्ष्‍य सेन याने मात्र सलग पाच गुण घेत २२-२० असा दुसरा गेमही जिंकत पहिल्या फेरीतील रोमांचक लढत जिंकली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT