स्पोर्ट्स

Tilak Varma बनला भारताचा नवा 'रन-चेज मास्टर'! कोहली-धोनीचा विक्रम मोडत रचला इतिहास; जाणून घ्या आकडेवारी

IND vs SA T20 : तिलक वर्माने नाबाद २६ धावांची संयमी खेळी करत खास विक्रमावर आपले नाव कोरले.

रणजित गायकवाड

ठळक मुद्दे

  • IND vs SA : तिलक वर्माने मोडला विराट कोहलीचा विक्रम

  • तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने द. आफ्रिकेचा ७ गडी राखून पराभव केला.

  • तिलक वर्मा भारताचा धावांचा पाठलाग करणारा नवा मास्टर बनला.

Tilak Varma vs Virat Kohli record T20I run chase average

धर्मशाला : भारतीय क्रिकेटमध्ये 'रन-चेज मास्टर' म्हणून ज्याची ओळख आहे, त्या विराट कोहलीचा (Virat Kohli) एक मोठा विक्रम युवा फलंदाज तिलक वर्माने (Tilak Varma) मोडला रविवारी द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मोडीत काढला. धर्मशाला येथे झालेल्या या तिसऱ्या टी-२० सामन्यात नाबाद २५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारत, २३ वर्षीय तिलकने एक अनोखी कामगिरी नोंदवली, ज्यामुळे त्याला आता भारताचा नवा 'रन चेज मास्टर' म्हणून ओळखले जात आहे.

कोहलीला टाकले मागे : टी-२० मधील सर्वोत्तम 'रन-चेस' सरासरी

द. आफ्रिकेविरुद्धच्या निर्णायक टी-२० सामन्यात भारताने ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आणि मालिका २-१ ने खिशात घातली. या विजयात तिलक वर्माने नाबाद २६ धावांची संयमी खेळी करत उपकर्णधार शुभमन गिलला उत्तम साथ दिली आणि संघाला विजयी मार्गावर आणले. या खेळीमुळे तिलक वर्माने एका खास विक्रमावर आपले नाव कोरले आहे.

रन चेज सरासरी

  • तिलक वर्मा : ६८.०० (रन चेज सरासरी)

  • विराट कोहली : ६७.१ (रन चेज सरासरी)

एका संघाविरुद्ध सर्वोच्च सरासरी

  • तिलक वर्मा : ७०.५० (विरुद्ध द. आफ्रिका)

  • विराट कोहली : ७०.२८ (विरुद्ध पाकिस्तान)

या अप्रतिम सरासरीमुळे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रन चेज करताना ५०० हून अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिलक वर्मा आता सर्वात जास्त सरासरी असलेला भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने केवळ विराट कोहलीलाच नाही, तर एम.एस. धोनी, जेपी डुमिनी (द. आफ्रिका) आणि कुमार संगकारा (श्रीलंका) यांनाही मागे टाकले आहे.

टी-२० मध्ये सर्वात जलद ४००० धावांचा टप्पा

तिलक वर्माने या सामन्यादरम्यान आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. त्याने आपल्या टी-२० कारकिर्दीत ४००० धावा पूर्ण केल्या आहेत आणि ही कामगिरी त्याने केवळ १२५ डावांमध्ये करून दाखवली आहे. या यादीत त्याने विराट कोहली आणि शुभमन गिल यांनाही मागे टाकले आहे.

  • ऋतुराज गायकवाड : ११६ डाव

  • केएल राहुल : ११७ डाव

  • तिलक वर्मा : १२५ डाव

  • शुभमन गिल : १२९ डाव

  • विराट कोहली : १३८ डाव

युवा वर्माने सिद्ध केले महत्त्व

तिलक वर्माने २० व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले. अगदी कमी वेळेत त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विशेषतः धावांचा पाठलाग करताना त्याची संयमी आणि जबाबदार खेळींनी त्याला एक 'स्पेशल' खेळाडू बनवले आहे.

द. आफ्रिकेविरुद्धच्या सध्याच्या टी-२० मालिकेत त्याने आतापर्यंत तीन सामन्यात एकूण ११३ धावा केल्या आहेत. यात दुसऱ्या सामन्यातील दमदार ६२ धावांची खेळीचा समावेश आहे. नंबर ३ वर खेळताना त्याने १४ डावांमध्ये ५८.५ च्या शानदार सरासरीने ४६८ धावा केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT