IND vs NZ 4th T20I Live Streaming Pudhari
स्पोर्ट्स

IND vs NZ 4th T20 Live: भारत-न्यूझीलंड चौथा T20 सामना कधी होणार? फ्री लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?

IND vs NZ 4th T20I Live Streaming: भारत-न्यूझीलंड T20 मालिकेत भारताने 3-0 अशी आघाडी घेतली असून चौथा सामना 28 जानेवारी 2026 रोजी विशाखापट्टणममध्ये होणार आहे. सामना सायं. 7 वाजता सुरू होईल, तर टॉस 6:30 ला होणार आहे.

Rahul Shelke

IND vs NZ 4th T20 Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची T20 मालिका आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. टीम इंडियाने आतापर्यंत शानदार खेळ करत सलग तीन सामने जिंकून 3-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका आधीच भारताच्या नावावर झाली आहे.

आता भारताचा प्रयत्न चौथा सामना जिंकून आपली पकड आणखी मजबूत करण्याचा असेल. हा चौथा T20 सामना 28 जानेवारी 2026 रोजी विशाखापट्टणमच्या ACA-VDCA क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.

भारताचा धडाकेबाज फॉर्म

तिसऱ्या T20 सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 8 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून मालिका जिंकली. त्या सामन्यात भारताचा विजय एकतर्फी झाला. लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा याने अवघ्या 20 चेंडूंत नाबाद 68 धावा ठोकल्या, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने 26 चेंडूंत 57 धावा केल्या. या दोघांच्या तुफानी भागीदारीमुळे सामना 10 षटकांच्या आतच संपला.

सामना कधी आणि कुठे होणार?

भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा T20 सामना बुधवार, 28 जानेवारी 2026 रोजी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे खेळला जाईल.

टॉस आणि सामन्याची वेळ (IST)

टॉस: सायं. 6:30
सामना सुरू: सायं. 7:00

लाइव्ह मॅच कुठे पाहता येईल?

भारतात या सामन्याचे थेट प्रसारण (Live Telecast) - Star Sports Network वर पाहता येईल. तर सामन्याचे Live Streaming- JioHotstar App आणि वेबसाइट वर उपलब्ध असेल. मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवरून क्रिकेटप्रेमींना सामना पाहता येईल.

संभाव्य Playing 11

भारत:
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती

न्यूझीलंड:
टिम सीफर्ट, डेव्होन कॉनवे, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डेरिल मिचेल, मिचेल सॅन्टनर, काईल जॅमीसन, मॅट हेन्री, ईश सोढी, जेकब डफी

भारत या सामन्यातही विजयासाठीच मैदानात उतरेल, कारण क्लीन स्वीपच्या दिशेने संघाचा पुढचा टप्पा असेल. दुसरीकडे न्यूझीलंडला मालिकेत पराभव टाळण्यासाठी आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी पूर्ण ताकदीने खेळावं लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT