IND vs ENG 5th Test Day
लंडन : इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने आपली आघाडी भक्कम करत इंग्लंडवर दडपण आणल्याचे वाटत असतानाच इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताला तीन धक्के दिले.
आकाशदीपने सुंदर अर्धशतकी खेळी साकारली. तर सलामीवीर यशस्वी जयस्वालने शानदार शतक ठोकले.
पण आकाशदीप आणि त्यानंतर लगेचच भारतीय कर्णधार शुभमन गिल हा स्वस्तःत पॅव्हेलियनमध्ये परतल्याने पुन्हा सामन्यावर इंग्लंडने वर्चस्व मिळवले. त्यानंतर करूण नायरही आऊट झाला. सध्या यशस्वी जयस्वाल आणि रविंद्र जडेजा खेळत असून भारताचा स्कोअर 5 आऊट 235 झाला आहे.
दुपारच्या सत्राच्या पहिल्याच चेंडूवर भारताचा कर्णधार शुभमन गिल (11) बाद झाला. गस अॅटकिन्सनच्या इनस्विंगिंग चेंडूवर गिल एलबीडब्ल्यू झाला आणि डीआरएसमध्ये निर्णय कायम राहिला.
गिलने या मालिकेत 754 धावा केल्या असून, तो सुनील गावसकर यांच्या 1971 मधील 774 धावांच्या विक्रमापासून अवघ्या 20 धावांनी मागे राहिला. तरीही, परदेशात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये त्याने मोठे स्थान पटकावले आहे.
या मालिकेतील आपले पहिले शतक लंडनमध्ये साजरे करणाऱ्या यशस्वी जयस्वालने पुन्हा एकदा दमदार खेळी केली आहे. त्याने 127 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 100 धावांची खेळी केली. यशस्वीने सकाळपासूनच दमदार फटकेबाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांची जणू टेस्टची घेतली.
भारताचा नाईटवॉचमन म्हणून शुक्रवारी मैदानावर आलेल्या आकाश दीपने इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत 66 धावांची लाजवाब खेळी केली. ही त्याची पहिली अर्धशतकी खेळी असून, त्याने यशस्वी जैस्वालसोबत 100 धावांची महत्वपूर्ण भागीदारीदेखील केली.
ही या मालिकेतील 18 वी शतकी भागीदारी ठरली असून, सन 2000 नंतर एखाद्या मालिकेत झालेल्या या सर्वाधिक भागीदारी आहेत.
आकाश दीप हा अमित मिश्रा (84, द ओव्हल) नंतरचा पहिला भारतीय नाईटवॉचमन आहे ज्याने अर्धशतक झळकावले. अमित मिश्राने 2011 साली अर्धशतक झळकावले होते.
शुभमन गिल बाद झाल्यावर फलंदाजीस आलेल्या करुण नायरची सुरुवात खडतर झाली. पहिल्याच चेंडूवर हातावर बॉल लागून त्याला दुखापत झाली. करूणने 32 चेंडूत 17 धावा केल्या.
त्यानंतर तो जरा अडखळत फलंदाजी करताना दिसून येत असून करूण चांगल्या कामगिरीच्या मानसिक दबावाखाली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सध्या दुसरे सत्र सुरू असून भारताने इंग्लंडविरोधात 211धावांची आघाडी घेतली आहे.